
Bhumi Pednekar: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या ‘मेरे हसबँड की बीवी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात भूमी हिच्यासोबत अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री रकुल प्रित सिंग महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या अभिनेत्री सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री भारतातील महिलांच्या सुरक्षेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, हेमा कमेटी बद्दल देखील अभिनेत्रीने मौन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात भूमी म्हणाली, ‘एक महिला म्हणून मला प्रचंड भीती वाटते. फक्त समाजाबद्दल नाही तर, मला भीती वाटते जेव्हा मुंबईत माझ्यासोबत राहणारी माझी छोटी बहीण रात्री 11 वाजेपर्यंत घरी येत नाही. मला भीती वाटते जेव्हा पहिल्या पानावर मला महिलांवर होणाऱ्या हिंसेबद्दल कळतं…’
‘ही फक्त एका दिवसाची गोष्ट नाही… असं रोज होत आहे. भारतात महिला म्हणून वावरायला मला भीती वाटते…’ एवढंच नाही तर, भूमी हेमा कमीटी बद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘हेमा कमीटी म्हणजे भारतीय समाजाचा एक भाग आहे. जेव्हा योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ज्यामध्ये अनेक धक्कादायक प्रकरणं देखील समोर आली…’ सध्या सर्वत्र भूमी पेडणेकर हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
भूमी पेडणेकर हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अभिनेत्री ‘मेरे हसबँड की बीवी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण 21 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दलदल’ या वेब सीरिजमध्ये देखील अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसत आहे. सीरिजमध्ये भूमीने एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे.
भूमी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील भूमीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.