AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Vs Rekha : शहेनशाह की उमराव जान? सगळ्यात श्रीमंत कोण? दोघांची संपत्ती ऐकून तोंडात घालाल बोट

Amitabh Bachchan Vs Rekha Net Worth : बॉलिवूडचे शहेनशाह, अमिताभ आणि उमराव जान, रेखा यांच्या प्रेमाबद्दल माहीत नाही, असा माणूस विरळाच. त्यांच्या प्रेमाची प्रचंड चर्चा व्हायची. ऑनस्क्रीन जोडीही लोकांना खूप आवडायची. आज आपण त्यांच्या नेटवर्थबद्दल अर्थात संपत्तीबद्दल जाणून घेऊया. अमिताभ की रेखा, सगळ्यात श्रीमंत कोण, ते जाणून घेऊया.

Amitabh Vs Rekha : शहेनशाह की उमराव जान? सगळ्यात श्रीमंत कोण? दोघांची संपत्ती ऐकून तोंडात घालाल बोट
अमिताभ बच्चन - रेखा नेटवर्थImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Oct 03, 2025 | 2:29 PM
Share

Amitabh Bachchan Vs Rekha Net Worth : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे स्टार असलेले बिग बी अर्थात अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी, रेखा, हे दोघे एकेकाळी त्यांच्या प्रेमसंबंधामुळे चित्रपटसृष्टीत चर्चेत होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि एकत्र असताना त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. मात्र नंतर ते दोघे वेगळेही झाले. त्यांची प्रेमकहाणी माहीत नाही असा इसम विरळाच असेल. त्यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा झाली. पण आज आपण त्यांच्या प्रेमकाहणीबद्दल नव्हे तर त्यांचं नेटवर्थ अर्थात संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

अमिताभ बच्चन 60 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत, तर रेखा यांनी 0७० च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. दोन्ही दिग्गजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत, ज्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी आणि संपत्ती मिळाली आहे. दोघांकडे किती संपत्ती आहे आणि त्यापैकी सर्वात श्रीमंत कोण आहे? चला जाणून घेऊया.

रेखाचे नेटवर्थ

सर्वात आधी आपण अभिनेत्र रेखा हिच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया. 70 वर्षांच्या रेखा हिने बॉलिवूडच्या इतिहासातील महान अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत उमराव जान, खून भरी मांग, खूबसूरत, सिलसिला, फूल बने अंगारे, मुकद्दर का सिंदर आणि मिस्टर नटवरलाल यासह अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

खरंतर रेखा आता बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, पण ती आलिशान जीवन जगते. रोल्स-रॉइस घोस्ट, ऑडी ए8, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास आणि बीएमडब्ल्यू आय7 इलेक्ट्रिक कारची मालक असलेल्या रेखा यांच्याकडे मुंबईतील बँड स्टँडमध्ये 100 कोटी रुपयांचा बंगला देखील आहे. तिचं एकूण नेटवर्थ 332 कोटी रुपये असल्याचं समजतं.

अमिताभ बच्चन यांचं नेटवर्थ

“शतकाचे महानायक” अमिताभ बच्चन यांनी संपत्तीच्या बाबतीत रेखा यांना मागे टाकले आहे. रेखा बिग बींच्या एकूण संपत्तीच्या जवळपासही नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बींची एकूण संपत्ती अंदाजे 3400 कोटी रुपये आहे. ते फक्त चित्रपटांतच नव्हे तर ब्रँड एंडोर्समेंट, कौन बनेगा करोडपती शो आणि गुंतवणुकीतूनही मोठी कमाई करतात. बिग बी यांच्याकडे रोल्स-रॉइस फॅंटम, पोर्श केमन एस आणि मर्सिडीज-मेबॅक एस560 सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत. तसेच मुंबईत त्यांचे जलसा, जनक आणि वत्स नावाचे कोट्यवधी रुपयांचे बंगले आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.