Bigg Boss: जेव्हा मधुरिमाने फ्राय पॅन तुटेपर्यंत विशालला मारलं; बिग बॉसमधला ‘तो’ थरारक Video

एक असा किस्सा, ज्याचा आवाज बिग बॉसच्या किचनमध्ये आजही घुमतो..

Bigg Boss: जेव्हा मधुरिमाने फ्राय पॅन तुटेपर्यंत विशालला मारलं; बिग बॉसमधला तो थरारक Video
बिग बॉसमधला 'तो' थरारक Video
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 24, 2022 | 2:13 PM

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चं 16 वं पर्व (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा सूत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) 1 ऑक्टोबरपासून स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. या नव्या सिझनमध्ये कुठलेही नियम नसणार, असं म्हटलं जातंय. यामुळेच अनेकदा हा शो वादात सापडला होता. आता नव्या सिझनमध्ये नवी कॉन्ट्रोव्हर्सी पहायला मिळणार आहे. तर या शोच्या आधीच्या पर्वातील काही किस्से आजसुद्धा प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत.

अभिनेत्री मधुरिमा तुली आणि विशाल आदित्य सिंह यांची लव्ह-स्टोरी त्या काळात खूप चर्चेत होती. बिग बॉसच्या घरात या वादग्रस्त जोडीला आमंत्रित करण्यात आलं होतं. एकेदिवशी मधुरिमाने भांडणानंतर विशालला फ्राय पॅनने मारलं होतं. मधुरिमाने त्याला इतक्या जोरात मारलं होतं की तिच्या हातातील फ्राय पॅनसुद्धा तुटला होता. नंतर विशालनेही मधुरिमावर पाणी ओतलं होतं.

बिग बॉसच्या किचनमधील हा किस्सा चांगलाच गाजला होता. ‘एक असा किस्सा, ज्याचा आवाज आजही बिग बॉसच्या किचनमध्ये घुमतो’ असं कॅप्शन देत कलर्स टीव्हीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये मधुरिमा आणि विशाल यांचं जोरदार भांडण पहायला मिळत आहे.

पहा व्हिडीओ-

मधुरिमा आणि विशाल यांची पहिली भेट ‘चंद्रकांता’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या दोघांनी एकाच वेळी एकाच सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. मात्र बिग बॉसच्या घरात येताच या दोघांमध्ये खटके उडू लागले होते. काही काळानंतर त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.

कलर्स टीव्हीने हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर शेअर करत हा इशारा दिला आहे की येणारा नवा सिझन हासुद्धा तितकाच वादग्रस्त असेल. त्यामुळे या नव्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी पहायला मिळतील आणि त्यांच्यात कोणते वाद होतील, हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.