AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती

| Updated on: Feb 22, 2021 | 1:06 AM
Share

Bigg Boss 14 Grand Finale 2021 Winner LIVE Updates बिग बॉस सीझन 14 चा आज महाअंतिम सोहळा संपन्न होत आहे. लवकरच अभिनेता सलमान खान विजेत्याची घोषणा करणार आहे

Bigg Boss 14 Winner : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती

मुंबई :  गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या 14 व्या मोसमाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. हा महाअंतिम सोहळा आणि हे मोसम कायमस्वरुपी स्मरणात राहील, असं ठरलं. या भव्य रिअॅलिटी शोची विजेती ही रुबीना दिलैक ठरली आहे. शेवटच्या क्षणी राहुल वैद्य आणि रुबीना यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, रुबीना हीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे रुबीना या मोसमाची विजेती ठरली.

रुबीना आणि राहुल वैद हे या मोसमातील दोन फायनलिस्ट ठरले होते. निक्की तांबोळी ही तिसरी फायनलिस्ट घराबाहेर पडली. महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणि भावनिक बघायला मिळाला. बिग बॉसने राहुल आणि रुबीना यांच्यात या मोसमात कशाप्रकारे स्पर्धा रंगली, त्यांच्यातील असलेल्या टोकाच्या मतभेदाची आठवण करुन दिली. अंतिम क्षणी घरातून बाहेर पडताना दोघी खूप भावूक झाले. राहुल वैद्य बिग बॉसच्या घरात नतमस्तक झाला. त्याने सलमान खानचे देखील आभार मानले.

या सीझनचा विजेता कोण असेल याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते. अखेर आज प्रेक्षकांना बिग बॉस सीझन 14 चा विजेता माहित पडला आहे (Bigg Boss 14 grand finale live updates).

यावर्षीच्या सीझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये काही नवखे स्पर्धक होते. तर काही गेल्या सीझनमधील होते. तर काही स्पर्धकांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. अंतिम सामन्यात बिग बॉसच्या घरात फक्त पाच स्पर्धक शिल्लक होते. यामध्ये रुबीना दिलैक, अली गोनी, राखी सावंत, राहुल वैद्य आणि निक्की तांबोली यांचा समावेश होता. या सर्वांची आज बिग बॉसच्या घरातून सुटका झाली. तर रुबीना दिलैक विजेती ठरली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Feb 2021 12:19 AM (IST)

    Rubina Dilaik Winner of Bigg Boss 14 : रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती

    गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या सीझनला अखेर विजेता मिळाला आहे. राहुल आणि रुबीना यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अखेर या सीझनचा विजेचा जाहीर झाला आहे. रुबीना दिलैक या सीझनची विजेता ठरली आहे.

  • 22 Feb 2021 12:04 AM (IST)

    Nikki Tamboli Eliminate : निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरातून बाहेर, दोन फायनलिस्ट शिल्लक, उत्सुकता शिगेला

    बिग बॉसच्या घरातून निक्की तांबोळी एलिमेनट झाली आहे. त्यामुळे आता फक्त दोन फायनलिस्ट शिल्लक राहिले आहेत. आता घरात राहुल वैद्य आणि रुबीना आहेत. कोण होणार विजेता हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • 21 Feb 2021 11:41 PM (IST)

    छोट्या पडद्यावरील कलाकारांचं मनमोहक नृत्य

    बिग बॉसच्या घरात कलर्स टीव्हीवरील सर्व मालिकांच्या कलाकारांनी खूप सुंदर नृत्य केलं. प्रत्येक मालिकेची एक जोडी मंचावर थिरकताना दिसली. यामध्ये बॅरिस्ट बाबू मालिकाच्या चिमुकल्यांनी वेळ मारुन नेली.

  • 21 Feb 2021 11:24 PM (IST)

    बिग बॉसच्या घरातील जय-विरुचा भन्नाट डान्स

    राहुल आमि अली यांनी सर्वात आधी ‘ये दोस्ती हम नही तोडेंग’ या गाण्यावर नृत्य केलं. त्यानंतर ते ‘हम दोनो है अलग-अलग’ या गाण्यावर थिरकताना दिसले. दोघांच्या नृत्यानंतर सलमानने राहुलला ही दोस्ती बिग बॉसच्या घराबाहेरही टिकेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर राहूलने 40 काय 400 वर्षे आमची दोस्ती टिकेल, असं उत्तर दिलं.

    View this post on Instagram

    A post shared by ColorsTV (@colorstv)

  • 21 Feb 2021 11:22 PM (IST)

    सलमान खान गब्बर, धर्मेंद्र विरु तर राखी सावंत बसंती

    महाअंतिम सोहळ्यात अनोख्या आणि मनोरंजनात्मक गोष्टी बघायला मिळत आहेत. या कार्यक्रमात शोले चित्रपटातील एक सीन क्रिएट करण्यात आलाय. यामध्ये धर्मेंद्र विरु, सलमान खान गब्बर आणि राखी सावंत बसंतीच्या भूमिकेत दिसले. यावेळी राखी सावंत ‘जब तक है जान’ गाण्यावर थिरकताना दिसली,

  • 21 Feb 2021 11:20 PM (IST)

    धर्मेंद्र यांचा स्पर्धकांना मायेचा सल्ला

    धर्मेंद्र यांनी बिग बॉसमधील स्पर्धकांना स्पर्धकांना मायेचा सल्ला दिला आहे. भांडण करण्यापेक्षा एकत्र गुण्या-गोविंदाने राहा, असं आवाहन धर्मेंद्र यांनी केलं

  • 21 Feb 2021 11:12 PM (IST)

    जॅस्मीन आणि अलीचा भन्नाट डान्स

    जॅस्मीन आणि अली यांचं एक वेगळं नात होतं. बिग बॉसच्या घरात मधल्या काळात त्यांच्यात बरेच वादविवाद झाले. मात्र, महाअंतिम सोहळ्यात दोघांनी मिळून ‘जरा जरा मेहकता है’ या गाण्यावर खूप सुंदर नृत्य केलं.

  • 21 Feb 2021 11:06 PM (IST)

    ‘यमला, पगला, दिवाना’, धर्मेंद्र यांची एन्ट्री

    ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं बिग बॉसच्या मंचावर स्वागत झालं आहे. ‘यमला पगला दिवाना’ या गाण्यात त्यांचं स्वागत करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी सर्व स्पर्धकांचं अभिनंदन केलं.

  • 21 Feb 2021 10:52 PM (IST)

    बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात धर्मेंद्र

    बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात धर्मेंद्र देखील दिसणार आहे. धर्मेंद्र आणि सलमान यांच्यात चांगलीच जुगलबंदी बघायला मिळणार आहे. त्यांच्या जुगलबंदीचा प्रोमो समोर आला आहे.

  • 21 Feb 2021 10:07 PM (IST)

    अली गोनी बिग बाॅसच्या घरातून बेघर

    बिग बॉस सीझन 14 चा आज महाअंतिम सोहळा संपन्न होत आहे.  अली गोनी याला बिग बाॅसच्या घरातून बेघर करण्यात आलं आहे.

  • 21 Feb 2021 09:51 PM (IST)

    Rakhi Sawant Eliminate : राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर

    राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर झाली आहे. राखी 14 लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घरातील स्पर्धेतून बाहेर पडली आहे. निक्की जिंकणार नाही. पण इतरांमध्ये खूप स्पर्धा आहे. पण रुबीना जिंकेल, असं माझं मन सांगतंय, असं राखी म्हणाली. मी 14 लाखांच्या बक्षिसमध्ये खूश आहे, असंही ती म्हणाली.

  • 21 Feb 2021 09:43 PM (IST)

    ‘परदेसिया’ गाण्यावर राखी सावंतचा डान्स

    राखी सावंतने ‘परदेसिया’ गाण्यावर जबरदस्त परफोर्मन्स केला. या गाण्यानंतर राखी सावंतला भेटण्यासाठी अभिनेता रितेश देशमुख बिग बॉसच्या घरात गेला.

  • 21 Feb 2021 09:32 PM (IST)

    महाअंतिम सोहळ्यात माधुरी दिक्षित

    महाअंतिम सोहळ्याच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना आता सप्राईज मिळालं आहे. कारण कार्यक्रमात थेट अभिनेत्री माधुरी दिक्षित बघायला मिळाली. माधुरीने सर्व स्पर्धकांशी व्हिडीओ कॉलद्वारे बातचित केली. त्याचबरोबर पाचही स्पर्धकांची आतापर्यंत जर्नी माधुरीने आपल्या अंदाजात सांगितली.

  • 21 Feb 2021 09:12 PM (IST)

    Bigg Boss 14 Grand Finale Start : बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात

    बिग बॉस सीझन 14 च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सलमान खानने आपल्या शैलीत कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. सध्या सर्व स्पर्धकांचे मजेशीर किस्से दाखवले जात आहेत. सर्व स्पर्धकांच्या नातेवाईकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. सलमान खानने सर्वांचे स्वागत केलं आहे.

Published On - Feb 22,2021 12:39 AM

Follow us
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.