Bigg Boss 17 | 24 तासही टिकला नाही ‘फेक’ ड्रामा; ‘बिग बॉस’ची पुन्हा एकदा पोलखोल

यंदाच्या सिझनमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैन, ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट, एक्स कपल इशा मालवीय-अभिषेक कुमार, मुनव्वर फारुखी, सोनिया बंसल, अनुराग डोबाल, मन्नारा चोप्रा, जिग्ना वोरा, सना रईस खान, रिंकू खान, युट्यूबर अरुण श्रीकांत माशेट्टी, फिरोजा खान हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.

Bigg Boss 17 | 24 तासही टिकला नाही फेक ड्रामा; बिग बॉसची पुन्हा एकदा पोलखोल
Abhishek Kumar and Isha Malviya
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2023 | 11:43 AM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा सतरावा सिझन रविवारी 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक अभिनेत्री इशा मालवीय आणि अभिषेक कुमार ही सर्वांत चर्चेत असलेली जोडी सहभागी झाली आहे. ‘उडारिया’ या मालिकेमुळे इशा घराघरात पोहोचली. शोमध्ये सहभागी होताच या दोघांनी हंगामा केला. सूत्रसंचालक सलमान खानसमोर दोघं त्यांच्या नात्याची पोलखोल करू लागले आणि घरात गेल्यानंतरही त्यांचा राग शांत झाला नाही. इशाने अभिषेकवर शारीरिक अत्याचाराही गंभीर आरोप केला. हे ऐकून सलमानसुद्धा चक्रावला होता. ‘क्या क्या बोले जा रही हो’, असं म्हणत त्याने तिला रोखलं. हे दोघं बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन हंगामा करतील, असा अंदाज नेटकऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र 24 तासांतच या भांडणाची पोलखोल झाली आहे.

सोशल मीडियावर इशा आणि अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांच्या भांडणामागील सत्य समोर आलं आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये इशा आणि अभिषेकने त्यांच्या नात्याचा खुलासा केला. स्वत:ची ओळख देताना आधी दोघांनी एकमेकांबद्दल वेगवेगळी वक्तव्यं केली. अभिषेकने सांगितलं की, इशाने त्याच्याशी ब्रेकअप करून दुसऱ्या अभिनेत्याला डेट करायला सुरुवात केली. तर इशाने म्हटलं की अभिषेक तिच्या मागे लागला होता, म्हणून तिला सर्वांना सांगावं लागलं की तो बॉयफ्रेंड आहे. इतकंच नव्हे तर इशाने अभिषेकवर शारीरिक अत्याचाराचाही आरोप केला.

पहा व्हिडीओ

दोघांमधील या आरोप-प्रत्यारोपानंतर आणि भांडणांनंतर आता सोशल मीडियावर जो व्हिडीओ समोर आला आहे, ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एकमेकांना क्षणभरही सहन न करणारे हे दोघं या नव्या व्हिडीओमध्ये सोबत डान्स करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर एकमेकांशी ते हसत बोलतानाही दिसले. हा व्हिडीओ पाहून बिग बॉसचे चाहतेसुद्धा चांगलेच भडकले आहेत.