Bigg Boss 18: बापरे आता हे काय? राशन मिळवण्यासाठी स्पर्धकांना खेळावा लागला किसिंग टास्क; टास्कनंतर प्रत्येकाचा विचित्र अनुभव

बिग बॉस 18 मध्ये राशन मिळवण्यासाठी एक अनोखा "किसिंग टास्क" दिला गेला, ज्यात स्पर्धकांना तोंडाने राशन एकमेकांना देणे आवश्यक होते. पण या टास्कमुळे स्पर्धांकांची चांगलीच अडचण झालेली पाहायला मिळाली.

Bigg Boss 18: बापरे आता हे काय? राशन मिळवण्यासाठी स्पर्धकांना खेळावा लागला किसिंग टास्क; टास्कनंतर प्रत्येकाचा विचित्र अनुभव
| Updated on: Nov 20, 2024 | 1:16 PM

‘बिग बॉस 18’ मध्ये आता बरेच रंजक वळण पाहायला मिळत आहे. त्यात आता वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाल्यानंतर घरातील टास्कही बदलण्यात आलेले आहेत. तसेच घरातील सदस्यांना आता राशन मिळवण्यासाठीही बरीच मेहनत घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

घरातील सदस्य त्यांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसे जेवण मिळत नसल्याची सतत तक्रार करताना दिसतात. पण बिग बॉस 18 मध्ये तीन सेलिब्रिटींच्या एन्ट्रीनंतर आता स्पर्धकांना पूर्ण राशन कमावण्याची संधी दिली. मात्र घरातील सदस्यांसाठी हे राशन मिळवणे सोपे नव्हते.

कारण यासाठी बिगबॉसने एक वेगळाच टास्क सदस्यांना दिला आहे. बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये स्पर्धकाला चक्क तोंडाने शिधा उचलून दुसऱ्या स्पर्धकाकडे द्यायचा होता पण तोही त्याच्या हातात नाही तर आपल्या तोंडातून समोरच्या व्यक्तीच्या तोंडांत. या टास्कमध्ये स्पर्धकांची चांगलीच अडचण झाली.

बिग बॉसने या टास्कसाठी ॲलिस कौशिकची संचालक म्हणून नियुक्ती केली होती आणि अट अशी होती की जर रेशन शेवटपर्यंत पोहोचण्याआधी कोणत्याही स्पर्धकाने त्या वस्तूंना स्पर्श केला किंवा राशनमधील कोणतीही वस्तू कोणाच्याही तोंडातून पडले तर त्यांना पुन्हा शिक्षा होईल आणि पहिल्यापासून हा टास्क करावा लागेल. हे कार्य एडिन रोजपासून सुरू करण्यात आले. बिग बॉसने एडिन रोजला स्पर्धकांसाठी राशन निवडण्याचा अधिकार दिला होता.

या टास्कदरम्यान स्पर्धकांनी अनेक वेळा खेळाच्या भरात चुकून एकमेकांचे चुंबन घेतले गेले. या कार्यात सामील असलेल्या प्रत्येक खेळाडूने या टास्कनंतर किमान दोनदा तरी दात घासल्याचे सांगितले.

वास्तविक विवियन डिसेनाला OCD आहे. ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये अनेक वैद्यकीय परिस्थिती आहेत. यापैकी एक परिस्थिती म्हणजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि आपले शरीर स्वच्छ ठेवणे. या स्थितीमुळे OCD रुग्णांना त्यांच्या वस्तू किंवा शरीराला इतरांनी स्पर्श करणे आवडत नाही. व्हिव्हियन डिसेना त्याचा मग एखाद्याने स्पर्श केल्यानंतरही तो पुन्हा धुतो.

याच कारणामुळे जेव्हा बिग बॉसने रेशनचा टास्क दिला तेव्हा विवियन सर्वात जास्त काळजीत होता. पण आपल्या घरातील सदस्यांना राशन मिळावे म्हणून त्याने हे काम पार पाडले. मात्र, या ‘किसिंग टास्क’मध्ये मेहनत करूनही या स्पर्धकांना अपेक्षित एवढे राशन मिळवता आले नाही.