भावाने नको ते कृत्य केलं, मी प्रेग्नंट होऊ नये म्हणून…अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
एका अभिनेत्रीने नुकताच मोठा खुलासा केला आहे. चुलत भावाने अभिनेत्रीसोबत असे काही केले की तिला यातून बाहेर पडयला प्रचंड वेळ लागला होता. तिला शाळेत असताना ती प्रेग्नंट आहे की काय अशी भीती वाटू लागली होती. कुटुंबियांना कळताच उचलले मोठे पाऊल.

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना आयुष्यात कामातून मिळालेल्या प्रसिद्धीशिवाय अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. नुकताच एका अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याबाबत केलेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही बिग बॉसमधील एका स्पर्धकाविषयी बोलत आहोत. तिने स्वत: शोमध्ये याबाबत खुलासा केला आहे. आता ती नेमकं काय म्हणाली? तिच्यासोबत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया
‘बिग बॉस २०’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा शो केवळ कंटेंटमुळे नव्हे, तर कंटेस्टंटमुळेही चर्चेत आहे. शोमध्ये कंटेस्टंट आपल्या गेमसोबत आपल्या पर्सनल लाइफबाबतही अनेक शॉकिंग खुलासे करताना दिसत आहेत. अशात शोच्या एका कंटेस्टंटने आपल्या खासगी आयुष्याबाबत असे काही सांगितले की ते ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला. या कंटेस्टंटने सांगितले की, तिच्या चुलत भावानेच अश्लील गोष्टी केल्या होत्या. इतकेच नव्हे, तर तिला वाटले की ती प्रेग्नेंट होईल. या भीतीने ती पपई खात होती.
ती अभिनेत्री कोण?
आम्ही बोलत आहोत ‘नागिन ७’मुळे चर्चेत आलेल्या कनिका मानविषयी. कनिका सध्या ‘बिग बॉस २०’मध्ये दिसत आहे. कनिका मानने काही महिन्यांपूर्वी हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीमध्ये या घटनेचा उल्लेख केला. कनिकाने मुलाखतीमध्ये सांगितले की, बालपणी तिच्या चुलत भावाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. या घटनेने ती खूप घाबरली होती. तिला वाटू लागले की ती प्रेग्नंट होणार आहे. त्या वेळी कनिकाला प्रेग्नन्सीबद्दल फारसे माहिती नव्हते.
प्रेग्नेंट होण्याच्या भीतीने पपई खाल्ली
अभिनेत्रीने सांगितले की, “मी तेव्हा इयत्ता चौथीमध्ये होते. मला माहीत नव्हते की बाळ कसे होते. मी इतकी घाबरले होते की सांगता येणार नाही. भीतीमुळे मी पपई खाऊ लागले. मी आपल्या घरातच काकी आणि वहिनीकडून ऐकले होते की प्रेग्नन्सीत पपई खाऊ नये, नाहीतर अबॉर्शन होईल. मला वाटू लागले होते की मी प्रेग्नेंट झाले आहे. मला भीती होती की मी प्रेग्नेंट झाले तर… म्हणून पपई खाणे सुरू केले होते.”
कनिका पुढे म्हणाली, “जेव्हा आम्ही विंटर किंवा समर वेकेशनला कोणाच्या घरी जात असू तेव्हा असे होत असे. मी असे म्हणत नाही की सर्वजण असे असतात, पण काही लोक मस्तीखोर प्रकारचे असतात. त्या वेळी मी आई-वडिलांना काही सांगितले नव्हते, कारण मनात एक भीती होती, एक गिल्ट होता की मी काही तरी चूक केली आहे. पण मी हिंमत करून खूप वेळानंतर आपल्या पेरेंट्सना याबद्दल सांगितले तर त्यानंतर आमचे येणे-जाणे थोडे कमी झाले.”