‘त्याने मला स्पर्श केला अन् माझ्याकडे…’ बिग बॉस फेम अभिनेत्रीसोबत मंदिराबाहेर घडली धक्कादायक घटना; व्हिडीओ केला शेअर

बिग बॉस फेम अभिनेत्रीसोबत एका मंदिराबाहेर धक्कादायक प्रकार घडला. तिची एका माणसाने छेडछाड केल्याचं तिने सांगितलं. तसेच तिने याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

त्याने मला स्पर्श केला अन् माझ्याकडे... बिग बॉस फेम अभिनेत्रीसोबत मंदिराबाहेर घडली धक्कादायक घटना; व्हिडीओ केला शेअर
Bigg Boss actress Aiden Rose harassed by an unknown man outside a temple, women safety incident
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2025 | 7:14 PM

अनेकदा अभिनेत्रींसोबत गर्दीत किंवा अनेकदा कार्यक्रमांमध्ये देखील अनेक धक्कादायक प्रकार घडतात, गैरवर्तनाचे प्रकार घडतात. अशीच एक घटना घडली आहे एका अभिनेत्रीसोबत. बिग बॉस फेम अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा भयानक प्रसंग एका व्हिडीओद्वारे शेअर केला आहे. एका मंदिराबाहेर तिच्यासोबत छेडछाड झाल्याचा प्रकार घडल्याची तिने सांगितले.

अभिनेत्रीचा हा व्हिडीओ व्हायरल 

ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस 18 फेम एडिन रोजने. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना तिने सांगितले की सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका मंदिराबाहेर तिच्यासोबत छेडछाडीचा प्रकार घडला आहे. ती म्हणाली की तिने पंजाबी सूट घातला असतानीही तिच्यासोबत हा एका व्यक्तीने गैरप्रकार केला आहे.

त्याने मला स्पर्श केला अन्…

व्हिडिओ शेअर करताना एडिन म्हणाली, “दिल्लीतील ही सर्वात मोठी समस्या आहे. मी पूर्ण पंजाबी सूट घातला होता. मी मंदिरासमोर उभी होते. तेव्हा तो माणूस मुद्दाम मला तीन वेळा धडकला. त्याने मला स्पर्श केला आणि माझ्याकडे पाहत गाणे गात होता. ”

ती पुढे म्हणाली, “त्याने मला ओळखलंही नाही. तिथे काही चाहते माझ्यासोबत सेल्फी काढत होते आणि त्यांनी सगळं रेकॉर्ड केलं. मला खूप राग आला होता. मला त्याला थप्पड मारायची होती, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं.” असं म्हणत तिने तिचा राग व्यक्त केला.


अभिनेत्रीने नंतर त्या माणसाला अनेक थप्पड मारल्या

एडिन मंदिरात एका माणसाला मदत मागतानाही दिसली आणि तिने त्याला परिस्थिती समजावून सांगितली. नंतर, जेव्हा तिचा फोटोग्राफर आला तेव्हा त्याने त्या माणसाला मारलं आणि तिथून पळवून लावलं. तेव्हा त्या माणसाने देखील त्याची चूक मान्य केली आणि म्हणाला, “मला मारा, मी चूक केली.” तेव्ह अभिनेत्रीने उत्तर दिले, “हे खरोखरच लज्जास्पद आहे.”

घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “अरे देवा!!! एडिन, अशा नालायक पुरुषांना धडा मिळावा म्हणून तू ते स्वतःच पोस्ट करायला हवे होतेस.” दुसऱ्याने लिहिले, ” तू खंबीर राहा.” तर अजून एकाने लिहिले, “हे दाखवण्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीला तिने काय घातले होते ते उघड करावे लागले हे बरेच काही सांगते.” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “म्हणूनच असे म्हटले जाते की अरब किंवा आखाती देश या बाबतीत अधिक सुरक्षित आहेत.” अनेक वापरकर्त्यांनी विचारले, “भारतात महिलांना कधी सुरक्षित वाटेल?” अशापद्धतीच्या अनेक प्रतिक्रिया चाहत्यांकडून आल्या आहेत.