Bigg Boss फेम अभिनेत्रीकडून पर्दाफाश, ‘दिग्दर्शकाने मला खोलीत बोलावलं, मध्यरात्री समोर बसवून ठेवलं आणि…’, जाणून व्हाल हैराण…

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. करियरच्या सुरुवातीला, अभिनेत्रीला मुंबईत बोलवण्यात आलं आणि एका खोलीत रात्रभर बसवून ठेवलं..., अभिनेत्रीसोबत नेमकं काय झालं जाणून व्हाल थक्क...

Bigg Boss फेम अभिनेत्रीकडून पर्दाफाश, दिग्दर्शकाने मला खोलीत बोलावलं, मध्यरात्री समोर बसवून ठेवलं आणि..., जाणून व्हाल हैराण...
| Updated on: Jun 28, 2026 | 12:34 PM

Bigg Boss : झगमगत्या विश्वातील पडद्यामागचं आयुष्य प्रचंड खडतर असतं. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी मोठा खुलासा केला आहे. दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अनेक अभिनेत्रींनी तर, झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. तर काही अभिनेत्रींनी परिस्थितीवर मात केली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणेज ‘बिग बॉस’ फेम फरहाना भट्ट… फरहाना सध्या ‘खतरों के खिलाडी 15’ शोमध्ये व्यस्त आहे… ‘लैला मजनू’, ‘सिंघम अगेन’ यांसारख्या सिनेमात भूमिका बजावणाऱ्या फरहाना हिने आता कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत फरहाना हिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

करियरच्या सुरुवातीला फरहाना हिला बॉलिवूड सिनेमांमध्ये काम मिळेल या बहाण्याने मुंबईत बोलवण्यात आलं होतं. फरहाना म्हणाली, ‘मला सांगितलं शुटिंग सुरु होणार आहे आणि हॉटेलमध्ये राहण्याची माझी व्यवस्था करण्यात आलेली. पण मुंबईत पोहोचल्यानंतर मला एका कथित दिग्दर्शकाच्या घरी नेण्यात आलं.’

ती रात्र आठवत फरहाना म्हणाली, ‘त्या रात्री मला करार वाचण्यासाठी देण्यात आला… त्यामध्ये अशी एक अट होती की, अभिनेत्रींना आठवड्यांसाठी दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावं लागेल… तो करार वाचल्यानंतर मला कळालं काही तरी गडबड आहे… मला प्रकरण संशयास्पद वाटलं. मी तात्काळ महिलेला फोन केला… दिग्दर्शकाने मला खोलीत बोलवलं, मी पूर्णपणे घाबरली होती…’

फरहाना पुढे म्हणते, ‘मला खोलीत बसवून ठेवलं होतं. माझ्या सुरक्षेसाठी मी फुलदानी हातात घेतली होती. मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला आणि सांगितलं, त्याने काही वाईट केलं तर, मी हल्ला करेल.. त्यानंतर मी त्या दिग्दर्शकावर दबाव टाकला आणि घरी परतण्यासाठी तिकीटांची व्यवस्था केली. अखेर सुखरुप श्रीनगर येथे पोहोचली… ‘, अंसं देखील फरहाना म्हणाली.

फरहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली. आज फरहाना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. आता सोशल मीडियावर फरहाना कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फरहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us