AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरेच्या किमती भडकल्या, आता ही दारू महागणार? तळीरामांना फटका?

Sugar prices hike Liquor : मद्यपींसाठी मोठी बातमी आहे. वाईनपासून ते अनेक ड्रिंक्स महागण्याची शक्यता आहे. कारण ते तयार करण्यासाठी साखर वापरली जाते. साखरेचे भाव शंभरी गाठण्याची भीती आहे. त्याचा परिणाम दारू उद्योगावर होण्याची शक्यता आहे.

साखरेच्या किमती भडकल्या, आता ही दारू महागणार? तळीरामांना फटका?
दारु महागणार?
| Updated on: Aug 25, 2026 | 5:24 PM
Share

भारतीय बाजारात गेल्या काही आठवड्यात साखरेच्या किरकोळ किमती दणादण वाढल्या. साखर 70 रुपयांच्या घरात आहे. ती लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर महागल्याचा परिणाम लागलीच चहा, मिठाई आणि कोल्ड ड्रिंक उत्पादनावर झाला आहे. चहा महागला आहे. मिठाई महागल्या आहेत. कोल्ड ड्रिंक आणि आता दारुच्या किमतीतही मोठा फरक दिसण्याची शक्यता आहे. प्रत्येक दारूत साखर टाकली जात नाही. पण काही ड्रिंक्समध्ये साखरेचा वारेमाप वापर होतो. आता मद्यही महागण्याची शक्यता आहे.

यामध्ये सर्वाधिक साखरेचा वापर

लिकुअर ड्रिंक मद्यप्रेमी आवडीने पितात. यामध्ये साखरेचा वापर होतो. हे एक फ्लेवर्ड ड्रिंक असते. कॉकटेल अथवा डेजर्टसोबत ते पिल्या जाते. त्यासाठी कमीत कमी 100 ग्रॅम प्रति लिटर साखरेचा वापर करण्यात येतो. अनेक नावाजलेल्या लिकुअर ब्रँडमध्ये हे प्रमाण 180 ते 350 ग्रॅम प्रति लिटरपर्यंत पोहचते. कारण त्यात इतर दारुपेक्षा अतिरिक्त साखर असते. बाजारात फ्लेवर्ड वोडका आणि फ्लेवर्ड रममध्ये थोड्या प्रमाणात साखर मिसळली जाते. मूळ वोडका आणि रममध्ये थोड्याप्रमाणात साखर मिसळली जाते.

दारु महागणार?

साखर महागल्याने दारूची किमत वाढले का? देशातील अनेक देशी आणि इंग्रजी दारू ही ऊस आणि मळीपासून तयार करण्यात येते. मळीचा वापर केल्याने दारूची किंमत वाढणार नाही. साखर तयार करण्यासाठी मोठी प्रक्रिया राबवली जाते. साखर थेट वापरली जात नसल्याने दारू महागणार नाही. पण ज्या पेयांमध्ये, दारूमध्ये रिफाईंड साखरचा थेट वापर होतो. त्याच्या किंमतीवर मोठा परिणाम होतो. राज्य सरकारचा टॅक्स आणि एक्साईज ड्युटीचा भार असतो. केवळ साखर किमत वाढल्याने दारुच्या किमतीत वाढ होईल असे नाही. कंपन्यांनी सुद्धा दारू दरवाढीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सुट्या बाजारात साखरेची किमत वाढली

सुट्या बाजारात साखर आणि खाद्यतेल या आवश्यक पदार्थांमध्ये दरवाढ झाली आहे. स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वीच डाळी, कडधान्ये, भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली आहे. सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. साखरेचा दर अचानक 75 रुपये किलोच्या घरात गेल्याने ग्राहकांत नाराजी पसरली आहे. सुट्या तेलावरूनही खडाजंगी सुरू आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. पुढील तीन महिन्यात जनतेची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ