Bigg Boss 17 : बिग बॉस स्पर्धकांना देतोय झोपेच्या गोळ्या? वादग्रस्त शोमधील धक्कादायक सत्य समोर

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' मधील धक्कादायक प्रकार... बिग बॉस स्पर्धकांना झोपेच्या गोळ्या देत असल्याचा आरोप.... सत्य अखेर समोर आलंच... सध्या सर्वत्र बिग बॉस आणि घरातील स्पर्धकांची चर्चा... 'बिग बॉस'च्या घरात नक्की चालू तरी काय?

Bigg Boss 17 : बिग बॉस स्पर्धकांना देतोय झोपेच्या गोळ्या? वादग्रस्त शोमधील धक्कादायक सत्य समोर
| Updated on: Oct 29, 2023 | 11:10 AM

मुंबई : 29 ऑक्टोबर 2023 : बिग बॉसच्या घरातून रोज नवीन अपडेट समोर येत असतात. ‘बिग बॉस 17’ सुरु होऊन काही दिवस झाले आहेत. म्हणून शोची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये वाढत आहे. बिग बॉसच्या घरात काय सुरु आहे. कोणता स्पर्धक अधिक दमदार आहे… यांसारख्या अनेक चर्चा सध्या चाहत्यांमध्ये सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. शो चर्चेत असताना एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. शोमध्ये यूट्यूबर यूके राइडर अनुराग डोभाल काही खास कमाल करताना दिसत नसल्याचं समोर येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे, बिग बॉसवर पक्षपाताचा आरोप करणार अनुराग डोभाल घरात अधिक वेळ झोपताना दिसत आहे. पण अनुराग डोभाल याचे चाहते वास्तव मान्य करण्यास नकार देत आहेतय एवढंच नाही तर, अनुराग डोभाल याच्या चाहत्यांनी बिग बॉसवर एक गंभीर आरोप केला आहे.

 

 

एक्सवर (ट्विटर) अनुराग डोभाल याचा फोटो पोस्ट करत, त्याला जाणूनबुजून झोपवलं जात असल्याचा आरोप केला आहे. ट्विटकरत अनुरागचे चाहते म्हणाले, ‘टीव्ही कलाकारांमध्ये भेदभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. बिग बॉस अनुराग डोवाल याला झोपेच्या गोळ्या देत आहेत, जेणेकरून तो दिवसभर झोपू शकेल… ‘ शिवाय बिग बॉस फिक्स असल्याचा दावा देखील अनुराग याच्या चाहत्यांनी केला आहे.

ट्विट व्हायरल झाल्यानंतर, अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याने ‘वीकेंड का वार’चा स्क्रिन शॉट सर्वांना दाखवला. ट्विट पाहिल्यानंतर अनुराग याच्यासोबत अन्य स्पर्धकांना शोमध्ये आमच्यासोबत असं काहीही होत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात आमच्यासोबत कोणताही गैरव्यवहार होत नसल्याचं सर्व स्पर्धकांनी सांगितलं आहे. अनुराग याने गेल्या आठवड्यात तक्रार केली होती की, त्याला डान्स करण्याची संधी दिली नव्हती. या वेळी अनुरागशी संवाद साधताना सलमानने त्याला डान्सची संधीही दिली. पण अनुराग डान्स शकत नव्हता, नॅशनल टीव्हीवर स्वतःची खिल्ली उडवल्यानंतर हे देखील स्पष्ट झाले की यूके रायडरला डान्स करता येत नाही… म्हणून त्याला डान्स करण्याची संधी दिली नाही.