AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Friends’ फेम Mathew Perry चं निधन; याठिकाणी आढळला मृतदेह, धक्कादायक माहिती समोर

'Friends' फेम Mathew Perry चा अंत अत्यंत भयानक, याठिकाणी मृतदेह आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या मृत्यूची चर्चा... अभिनेत्याच्या मृत्यूमुळे हॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ... चाहत्यांना देखील मोठा धक्का...

'Friends' फेम Mathew Perry चं निधन; याठिकाणी आढळला मृतदेह, धक्कादायक माहिती समोर
| Updated on: Oct 30, 2023 | 9:08 AM
Share

मुंबई : 29 ऑक्टोबर 2023 : अमेरिकेतील मॉडेल मलीसा मूनी हिच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचं निधन झालं आहे. ज्यामुळे हॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदवीर अभिनेता मॅथ्यू पेरी याचं निधन झालं आहे. अभिनेता त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मॅथ्यू याचं निधन हॉट टबमध्ये बुडून झालं आहे. ज्यामुळे हॉलिवूड सेलिब्रिटींना आणि अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘फ्रेंड्स-लाइक अस’मुळे मॅथ्यू याची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. ज्यामध्ये अभिनेत्याने चँडलर बिंग या भूमिकेला न्याय दिला.

मॅथ्यू पेरी हा अभिनेता जॉन बेनेट पेरी आणि कॅनडाचे पंतप्रधान पियरे ट्रूडो यांच्या प्रेस सेक्रेटरी सुझान मॅरी लँगफोर्ड यांचा मुलगा आहे. अभिनेत्याचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ मध्ये विलियम्सटाउन याठिकाणी झाला होता. अभिनेत्याने त्याच्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली.

‘चार्ल्स इन चार्ज’च्या माध्यमातून मॅथ्यू याने करियरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘बेवर्ली हिल्स 90210’ आणि ‘ए नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रियरडन’ च्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीला आला. पण ‘फ्रेंड्स’मुळे मॅथ्यू प्रसिद्ध झोतात आला.

‘फ्रेंड्स’ सीरिज 22 सप्टेंबर 1994 रोजी सुरू झाली आणि 6 मे 2004 रोजी संपली. या काळात 236 भागांसह ‘फ्रेंड्स’चे दहा सीझन प्रसारित झाले. त्याने फुल्स रश इन, ऑलमोस्ट हीरोज, द होल नाइन यार्ड्स, 17 अगेन आणि द रॉन क्लार्क स्टोरी यासह अनेक सिनेमांमध्ये देखील काम केले आहे.

६ महिन्यांनंतर तुटला अभिनेत्याचा साखरपुडा

मॅथ्यू याने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्याचं लग्न झालं नव्हतं. पण काही वर्षांपूर्वी अभिनेत्याचं मॉली हर्विट्ज़ हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर साखरपुड्यानंतर सहा महिन्यात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर, अभिनेत्याचं नाव लिजी कॅुपलान हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं.

अंमली पदार्थांच्या व्यसनातून सावरण्यासाठी खर्च केले कोट्यवधी रुपये

मिळालेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीत खुद्द मॅथ्यूने खुलासा केला होता की वयाच्या १४ व्या वर्षापासून त्याला ड्रग्जचे व्यसन होतं. वयाच्या १४ व्या वर्षानंतर अभिनेत्याला अनेक आजारांचा सामना करावा लागला. व्यसनातून स्वतःला सावरण्यासाठी अभिनेत्याने तब्बल ९ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ७४ कोटी रुपये खर्च केले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?