AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Chavan: खूप मिस करतोय दादा; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणने शेअर केला Video, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Suraj Chavan: बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाणने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी...

Suraj Chavan: खूप मिस करतोय दादा; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणने शेअर केला Video, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Suraj ChavanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 04, 2026 | 1:30 PM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आजही अनेकांना खरी वाटत नाही. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकाकुल झालं आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते सतत त्यांची आठवण काढत आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आहे. अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामान्य माणसांचे अनेक प्रश्न सोडवले. यात ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाणचाही समावेश आहे. अजितदादांनी सूरजसाठी घर बांधून दिलं होतं, ज्यामुळे सूरजचे आयुष्य पूर्णपणे बदललं.

काय आहे पोस्ट?

अलीकडेच सूरजने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सूरज आणि त्याची पत्नी दिसत आहेत. सूरजने फुलांनी सजवलेली ‘दादा’ ही अक्षरे तयार केली आहेत. नवीन घरात अजितदादांचा फोटो लावून त्याच्यासमोर हात जोडले आहेत. फोटोला हार घालून आदरांजली वाहिली आहे.

व्हिडीओ शेअर करत सूरजने दिलेल्या कॅप्शन अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. “दादा, कायम आठवणीत राहणार तुम्ही. खूप मिस करतोय दादा” असे सूरजने म्हटले आहे. अजितदादांच्या निधनानंतर सूरजने आधीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. त्याने लिहिलं होतं की, “मित्रांनो माझा देव चोरला आज… मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत… माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं… माझी काळजी घेतली.. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही… याचं मला लई वाईट वाटतय… लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन…”

अनेकांनी केल्या कमेंट्स

सूरजच्या या भावुक पोस्ट आणि व्हिडीओने अनेकांना हेलावून टाकलं आहे. अजितदादांच्या स्मृतीत सूरजची ही श्रद्धांजली खूपच हृदयस्पर्शी आहे. अनेकांनी या पोस्टवर अजित पवारांना आदरांजली वाहिली आहे.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय