BIGG BOSS 6: ओढूनताणून, घाबरून, मनात नसतानाही…, विशाल-अनुश्रीसाठी ‘बिग बॉस’ Ex स्पर्धकाची लक्षेवधी पोस्ट
BIGG BOSS MARATHI 6 FINALE: 'बिग बॉस मराठी 6' विजेता आता लवरच जाहिर होणार आहे. पण आता ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रत्येक स्पर्धक स्वतःसाठी खेळत असताना, विशाल आणि अनुश्री यांच्या मैत्रीचं कौतुक 'बिग बॉस'च्या EX स्पर्धकाने केलं आहे...

BIGG BOSS MARATHI 6 FINALE: बिग बॉस मराठी 6′ विजेता कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. फिनालेसाठी काही दिवसच शिल्लक असताना ‘बिग बॉस’च्या टास्क देखील कठीण होणाता दिसत आहेत. बिग बॉस मराठी 6 शोला आता टॉप फायनलिस्ट मिळाले आहेत. या सीझनमध्ये अनेकांमध्ये मैत्री झाली, कर काहींचं भाऊ – बहिणीच्या नात्यापर्यंत गेलं. अशात एका माजी बिग बॉस स्पर्धकाने विशाल कोटियन आणि अनुश्री माने यांच्यातील नात्याचं कौतुक केलं.
सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये विशाल आणि अनुश्री यांच्यात असलेलं भाऊ – बहिणीचं नातं सर्वांना दिसलं. अनुश्री हिच्याबद्दल विशाल भावूक होत म्हणाला, ‘या घरात एक मुलगी आहे, जी कायम खोटं बोलते की, तिला भावना नाही तर, पण खरं तर की खूप इमोशनल आहे आणि न सांगता देखील इतरांसाठी बरंच काही करते…’ एवंढच नाही तर, जेव्हा विशाल याने अनुश्री हिला ‘बाळू’ म्हणत चॉकलेट भरवलं, तेव्हा दोघांच्या डोळ्यात देखील पाणी होतं…
दोघांच्या नात्याबद्दल ‘बिग बॉस मराठी 4’ मधील लोकप्रिय स्पर्धक किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. दोघांचे फोटो पोस्ट करत किरण माने म्हणाले, ‘ अनुश्री-विशाल… लब्यू यार. खुप खरे आहात. खुप छान खेळत आहात. ओढूनताणून, घाबरून, मनात नसतानाही बळजबरीने टिकवून ठेवलेल्या ‘फेक’ ग्रुपसमोर तुमचा खरेपणा लखलखून उजळला आहे. ट्रॉफी मिळो न मिळो. तुम्ही ‘मनं’ नक्कीच जिंकली आहेत…अनुश्री, माझी सातारकरीण… अभिमान आहे तुझा.’
किरण माने यांची पोस्ट पाहिल्यानंतर अनुश्रीच्या चाहत्यांना आनंद झाला. सध्या किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. ‘बिग बॉस 6’ बद्दल सांगायचं झालं तर, मंगळवारी रेवा कौरसेचा प्रवास संपला असून ‘बिग बॉस 6’ ला टॉप 5 स्पर्धक भेटले आहेत.
‘बिग बॉस 6’ शोच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये अनुश्री माने, विशाल कोटियन, राकेश बापट, तन्वी कोलते आणि दीपाली सय्यद आहेत. आता या शर्यतीत कोण बाजी मारणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे… ‘बिग बॉस 6’ची ट्रॉफी कोण घरी घेवून जाणार हे लवकरच कळणार आहे. विजेता कोण होणार याचीच उत्सुकता आता प्रेक्षकांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.