Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी 7 येणार प्रेक्षकांच्या भेटीला, स्पर्धकही ठरले? व्हायरल पोस्टची चर्चा

Bigg Boss Marathi 7: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये बिग बॉस मराठी सिझन 7मध्ये कोणते स्पर्धकही सहभागी होणार याबाबतही माहिती दिली आहे.

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी 7 येणार प्रेक्षकांच्या भेटीला, स्पर्धकही ठरले? व्हायरल पोस्टची चर्चा
Bigg Boss Marathi 7
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 3:05 PM

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. सहा महिनाभरापूर्वी बिग बॉस मराठीचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सहावा सिझन अभिनेत्री तन्वी कोलतेने जिंकला होता. आता प्रेक्षकांमध्ये सातव्या सिझनची उत्सुकता लागली आहे. हा सिझन कधी प्रदर्शित होणार याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. तसेच या पोस्टमध्ये बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची देखील नावे देण्यात आली आहेत. मात्र, ही केवळ एक व्हायरल पोस्ट आहे.

बिग बॉस मराठी सिझन सातची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. हा सिझन कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सोशल मीडियावर देखील याबाबत एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये बिग बॉस मराठीचा सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी काही कलाकरांचे फोटो वापरले आहेत. हे कलाकार बिग बॉस मराठी 7मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

Loading...

कोणत्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा?

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये बिग बॉस मराठी सातमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. या मध्ये यूट्यूबर, गेमर श्रीमान लेजंट, गायक संजू राठोड, विवेक रुपेशा मनोज पाटील, कॉमेडियन प्रणित मोरे, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेता विनायक माळी यांची नावे घेण्यात आली आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केवळ एक व्हायरल पोस्ट असून चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठी सिझन सातबद्दल उत्सुकता वाढली आहे. ते या शोच्या अधिकृत घोषणेची वाट पाहात आहेत. तसेच यंदाच्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us