Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात आले खुद्द ‘बिग बॉस’; पहिल्यांदाच घडलं असं, कोणीच ओळखलं नाही?

| Updated on: Dec 21, 2022 | 2:32 PM

'बिग बॉस'ला आवाज देणारे व्हॉईस आर्टिस्ट बिग बॉसच्या घरात; चाहतेही झाले थक्क!

Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात आले खुद्द बिग बॉस; पहिल्यांदाच घडलं असं, कोणीच ओळखलं नाही?
अर्चना गौतम
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: बिग बॉसचा सोळावा सिझन प्रत्येक एपिसोडनुसार रंजक होत चालला आहे. कधी स्पर्धकांची भांडणं तर कधी त्यांचे अफेअर्स, मैत्रीत मिळालेला दगा तर कधी मैत्रीसाठी केलेला त्याग.. या सर्व गोष्टी प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. या सर्व गोष्टींदरम्यान आता खुद्द बिग बॉसच घरात येणार आहे. आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. जिथे बिग बॉसला आवाज देणारे विजय विक्रम सिंह घरात पाहुणे बनून आले आहेत.

चाहतेसुद्धा बिग बॉसला बिग बॉसच्या घरात पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. असं पहिल्यांदाच घडलंय की बिग बॉसचा वॉईस ओव्हर आर्टिस्ट बिग बॉसच्या घरात आला आहे. हा ट्विस्ट चाहत्यांनाही समजला नाही. यात मजेशीर बाब म्हणजे प्रोमोमध्ये ऐकू येणारा आवाजसुद्धा विजय विक्रम यांचाच आहे.

हे सुद्धा वाचा

विजय विक्रम सिंह हे प्रसिद्ध वॉईस ओव्हर आर्टिस्ट आहेत. त्यांनी 2009 मध्ये वॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांना बिग बॉसच्या निर्मात्यांकडून ई-मेल आला. ऑडिशनदरम्यान त्यांची निवड झाली आणि ते देशातील सर्वांत मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये बिग बॉसला आवाज देऊ लागले. बिग बॉसमुळे त्यांच्या करिअरला नवीन वळण मिळालं. आपल्या आवाजामुळे विजय सध्या कोट्यवधींची कमाई करत आहेत.

विजय यांनी आतापर्यंत जवळपास 14 सिझन्ससाठी काम केलंय. ते अभिनयक्षेत्रातही सक्रीय आहेत. फॅमिली मॅन 2, स्पेशल ओप्स 1.5- द हिंमत स्टोरी, 777 चार्ली यांसारख्या सीरिजमध्ये त्यांनी काम केलंय.

विशेष म्हणजे बिग बॉसला आवाज देणारे फक्त विजय विक्रमच नाहीत. बिग बॉसचे ओरिजिनल वॉईल ओव्हर आर्टिस्ट अतुल कपूर आहेत. त्यांचासुद्धा आवाज खूप लोकप्रिय आहे. बिग बॉस चाहते है.. असे शब्द तुम्ही त्यांच्या आवाजात अनेकदा ऐकलं असणार. अतुल हे 2006 पासून बिग बॉसशी जोडलेले आहेत.