
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू ही नेहमीच आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. तिने नेहमीच ग्लॅमरस लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे.
प्रेग्नेंसीनंतर बिपाशा बसूचे वजन निश्चितच वाढले होते, मात्र तिने मुलगी झाल्यानंतरही स्वत:ला तेवढं फिट ठेवलं होतं. बिपाशा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना नेहमीच तिच्या आयुष्याची अपडेट देत असते. सोशल मीडियावर तिची शेवटची पोस्ट तीन दिवसांपूर्वी होती ज्यामध्ये तिने कॅट आय सनग्लासेस घातलेले तिचे काही फोटो शेअर केले होते . या फोटोंमध्ये बिपाशा अगदी आहे तशीच पूर्वीसारखीच सामान्य दिसत आहे. ना की व्हायरल फोटोंमध्ये दाखवल्याप्रमाणे.
बिपाशाच्या व्हायरल फोटोंमागील सत्य?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये बिपाशा बासू जिममधून बाहेर पडतानाचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये तिचं वजन वाढलेलं दिसत आहे, तर तिचा चेहरही सुजलेला दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून तिच्या पोस्टमध्ये चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत लिहिले आहे की, “एकेकाळी पोस्टर गर्ल असलेली बिपाशा आता खूप बदलली आहे”. हे व्हायरल फोटो फेक अकाउंट वरून एडीट करून व्हायरल केलेले असल्याचं म्हटलं जात आहे. बिपाशाचे व्हायरल झालेले फोटो पाहून अनेक लोक तिच्या अधिकृत अकाउंटला भेट देत आहेत.
चाहत्यांचा पाठिंबा
एका सोशल मीडिया युजरने बिपाशा बसूच्या अधिकृत अकाउंटवर कमेंट सेक्शनमध्ये कमेंटही केली आहे, “बिपाशाचे व्हायरल बनावट फोटो पाहून इथे कोण कोण आले आहेत?” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बिपाशा, बरेच लोक सोशल मीडियावर तुझे बनावट फोटो शेअर करत आहेत आणि दावा करत आहेत की तुझा लूक असून तो आता पूर्णपणे बदलला आहे. मला खात्री आहे की तूही या ट्रोलर्सचे व्हायरल फोटो पाहिले असतील. मी फक्त एवढेच म्हणू इच्छितो की त्याबद्दल विचार करू नकोस, अशा लोकांमुळे तुला त्रास होऊ नये.” असं म्हणत चाहत्यांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान बिपाशाने अजून तरी या फोटोंवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
लग्नानंतर बिपाशा चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बिपाशा बसू शेवटची ‘वेलकम टू न्यू यॉर्क’ चित्रपटात दिसली होती. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने फारशी कमाल केली नाही आणि त्यात बिपाशा बसूने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने 2015 मध्ये ‘अलोन’ मध्ये काम केलं होतं. लग्नानंतर बिपाशा बसूने स्वतःला चित्रपटसृष्टीपासून दूर केलं आणि तेव्हापासून ती तिचा बहुतेक वेळ तिच्या कुटुंबासोबत घालवताना दिसते.