
Salman Khan: अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमांमुळे कमी पण वादग्रस्त प्रकरणांमुळे अधिक चर्चेत असतो. आता देखील अभिनेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेत्याने समलान खान याच्यावर फक्त आरोप केले नाहीत, तर त्याला देशद्रोही म्हणत फाशीची शिक्षा द्या.. असं देखील म्हटलं आहे. मंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी सलमान खानला देशद्रोही म्हटलं आहे आणि त्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. सांगायचं झालं तर, ठाकूर रघुराज सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
अलीगढला दौऱ्यावर असलेले योगी सरकारचे मंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी त्यांच्या भाषणात सलमान खान याच्यावर निशाणा साधला. ‘सलमान खान याचं पाकिस्तानवर प्रचंड प्रेम आहे… म्हणून त्याने पाकिस्तानात जायला हवं. कारण हिंदुस्तानात हिंदू जनतेला स्वतःचा नाच दाखवत पेसै कमावतो आणि पाकिस्तानाला सपोर्ट करतो… बांग्लादेशाला सपोर्ट करतो… मुस्लिमांना पाठिंबा देतो आणि हिंदू जनतेकडून पैसे कमावतो… सलमान खान देशद्रोही आहे. त्याला फाशी झाली पाहिजे.’
पुढे ठाकूर रघुराज सिंह म्हणाले, ‘मी भारतातील हिंदूंना आवाहन करू इच्छितो की, सलमान खान याचे सिनेमे कधीच पाहू नका. तो चोर आहे… डकैत आह… लबाड आहे…’, भाजप मंत्र्यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
योगी सरकारमधील मंत्रीपदाचे राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी असं विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. मंत्र्यांनी यापूर्वी एएमयूबाबत अनेक विधानं केली आहेत, त्यानंतर मंदिर आणि मशिदींबाबतही विधानं केली आहेत. मात्र, यावेळी त्यांचं प्रमुख विधान बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी संबंधित आहे.
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. बहुप्रतिक्षीत सिनेमाची कथा ही सत्य घटनेवर आधारीत आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात २०२० मध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. सलमान खान स्टारर ‘बॅटल ऑफ गलवान’ 17 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांत रिलीज होईल. चाहते देखील भाईजानच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे.