
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान याने मोठी घोषणा केली. आमिर खान स्पष्ट केले की, पुढील काही दिवस तो ब्रेक घेणार आहे. सतत अनेक वर्षे चित्रपटांमध्ये (Movie) काम करत असल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांना अजिबातच वेळ देता आला नाही. यामुळे तो आता कुटुंबियांना वेळ देईल. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातारवण हे बघायला मिळाले.
आमिर खान याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. मात्र, चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाकडून आमिर खान याला मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यामुळेच आमिर खान याने काही वर्षे ब्रेक घेण्याचा निर्णय घेता. चित्रपट फ्लाॅप गेल्याने तो निराश झाला.
गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा पुरस्कार सोहळे आणि शोमध्ये जाणे देखील टाळताना दिसतो. सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण हे बघायला मिळतंय. मुंबईमध्ये लोकांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी देखील केलीय. नुकताच आमिर खान याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
२६-९-२०२३ 📍 मुंबई
प्रसिद्ध उद्योजक श्री मुकेश अंबानी व मान्यवरांचे ‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणेश दर्शन pic.twitter.com/M8Gz1YSxSV
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 27, 2023
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आमिर खान हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पोहचलाय. यावेळी विशेष सजावट केल्याचे देखील दिसतंय. फक्त आमिर खान हाच नाही तर मुकेश अंबानी, नीता अंबानी हे आपल्या कुटुंबासह पोहचले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी आरती करताना अंबानी कुटुंब दिसत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमिर खान याचे स्वागत करताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. आमिर खान याची लेक इरा खास हिचा काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये साखरपुडा हा पार पडला. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार पडला. इरा सोशल मीडियावर सक्रिय दिसते.