अक्षय कुमार याचा पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाला, झोपण्यापूर्वी ती बेड..

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कायमच चर्चेत असतो. नुकताच अक्षय कुमार याने पत्नीबद्दल धक्कादायक खुलासा केला, ज्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचे बोलणे ऐकून विविध चर्चा सुरू आहेत.

अक्षय कुमार याचा पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाला, झोपण्यापूर्वी ती बेड..
Akshay Kumar and Twinkle Khanna
| Updated on: Jan 22, 2026 | 2:11 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. आता नुकताच एका शोमध्ये अक्षय कुमार याने पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला. अक्षय कुमार याचे बोलणे ऐकून सर्वचजण हैराण झाले. अक्षय कुमार गेम शो व्हिल ऑफ फॉर्च्यूनला घेऊन येतोय, ज्याचा प्रोमो तूफान व्हायरल होत आहे. या शोमध्ये पाहुणे म्हणून रितेश देशमुख, जेनिलिया डिसूजा, तुषार कपूर, साजिद खान आणि श्रेयश तळपदे दाखल झाले. सर्वजण धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये अक्षय कुमार रितेश आणि जेनेलिया यांना विचारतो की, तुम्ही किती वर्षापासून एकत्र आहात. यावर रितेश म्हणतो की, 10 वर्ष डेटिंग आणि 14 वर्ष लग्नाला झाली. म्हणजेच 24 वर्ष झाली. यावर अक्षय कुमार हा रितेश देशमुखला मोठा सल्ला देताना दिसला.

यावर अक्षय कुमार म्हणतो की, 25 वाल्यांना विचारा येथे सॉरी बोलायला शिका… यावर जेनेलिया म्हणते की, तो सॉरी रितेश आहे… यावर रितेश म्हणतो, मी लगेचच माफी मागतो. अक्षय कुमार पुढे म्हणतो की, माझी पत्नी खूप जास्त वेगळी आहे. ज्यावेळी मी झोपायला जातो, त्यावेळी मला समजते की, माझी पत्नी रागावली आहे. मी ज्या बाजूने झोपतो ती पूर्ण बाजू ओली असते.

ती सरळ पाणी फेकून बेड वोला करते.. अक्षय कुमार याचे बोलणे ऐकून रितेश देशमुख जोरजोरात हसताना दिसत आहे. यावर रितेश देशमुख म्हणाला की, आय लव्ह ट्विंकल… रितेश देशमुख गेम जेनेलियासोबत मिळून खेळताना दिसत आहे. अक्षय कुमार याने पहिल्यांदाच हा खुलासा केला आहे. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

ट्विंकल खन्ना अगोदर अक्षय कुमार हा शिल्पा शेट्टीला डेट करत. अनेकदा शिल्पा शेट्टी हिने अक्षय कुमारने आपल्याला कशाप्रकारे धोका दिला हे सांगताना दिसते. अक्षय कुमारला बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणतात. त्याने अनेक हीट चित्रपट आतापर्यंत बॉलिवूडला दिली असून जबरदस्त अशी त्याची फॅन फॉलोइंग बघायला मिळते.