AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन गाडी चालवत निघाले थेट या मित्राच्या घरी, व्हिडीओ व्हायरल, 83 व्या वर्षी बिग बी…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय आहेत. 83 व्या वर्षी जबरदस्त फिटनेस बिग बींचा दिसतो. सध्या अमिताभ बच्चन यांचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. स्वत: गाडी चालवत मित्राच्या घरी अमिताभ बच्चन पोहोचले.

अमिताभ बच्चन गाडी चालवत निघाले थेट या मित्राच्या घरी, व्हिडीओ व्हायरल, 83 व्या वर्षी बिग बी...
Amitabh Bachchan
| Updated on: Nov 13, 2025 | 9:00 AM
Share

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आले असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. हेमा मालिनी, ईशा देओल, बॉबी देओल सर्वजण यादरम्यान रूग्णालयात उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी रूग्णालयात धाव घेतली. धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा पसरताना दिसली. ज्यानंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. धर्मेंद्र यांना संक्रमण होण्याची शक्यता अधिक असल्याने कुटुंबियांनी सर्वांना विनंती केली की, त्यांना भेटण्यासाठी कोणीही येऊ नये. बुधवारी संध्याकाळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन जुहूमध्ये गाडी चालवताना दिसले. धर्मेंद्र यांच्या घराजवळ अमिताभ बच्चन स्पॉट झाले.

धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात ते दाखल होते. मात्र, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. त्यांच्या जुहू बंगल्यात परतले आहेत जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या जुहू बंगल्याच्या परिसरात स्पॉट झाले. यामुळे अमिताभ बच्चन हे धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले जातंय. अमिताभ बच्चन यांना पाहिल्यावर धर्मेंद्र यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चन स्वत:च गाडी चालवत आले होते. अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिरवे जॅकेट आणि टोपी घालून इलेक्ट्रिक कार चालवताना अमिताभ बच्चन दिसले. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. दोघांची जोडी चांगलीच फेमस होती. दोघांमध्ये खास मैत्री होती. अमिताभ बच्चन मित्रांच्या भेटीला पोहोचल्याचे सांगितले जातंय.

जय आणि वीरूची जोडी हिट झाली. अमिताभ आणि धर्मेंद्र यांनी गुड्डीमध्येही एकत्र काम केले. असंख्य चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या तब्येतीमध्ये चढउतार बघायला मिळतोय. मध्यंतरी धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले गेले. यादरम्यानच्या काळात त्यांचे सर्व सहा मुले त्यांच्यासोबत आहेत. ईशा देओल, सनी देओल आणि बॉबी देओलचे हॉस्पिटलमध्ये जातानाचे अनेक व्हिडीओ पुढे आली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...