AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राजपाल यादवची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट, तीन मुलींचा बाप म्हणून मनातलं सांगितलं, सगळ्यांचीच बोलती बंद

अभिनेता राजपाल यादवने नवरात्रीच्या निमित्ताने एक मोठी पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. तीन मुलींचा बाप म्हणू तो व्यक्त झाला आहे. नेमकं काय म्हणाला राजपाल? जाणून घ्या.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राजपाल यादवची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट, तीन मुलींचा बाप म्हणून मनातलं सांगितलं, सगळ्यांचीच बोलती बंद
Rajpal Yadav navratri postImage Credit source: social media
| Updated on: Oct 11, 2026 | 3:54 PM
Share

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडिअन राजपाल यादव याने एक पोस्ट शेअर केली आहे. नवरात्रीनिमित्ताने त्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्य त्याने सगळ्यांना विनंती केली की, ज्या मनोभावे आपण सगळे दुर्गामातेची पूजा करतो. त्याचप्रमाणे आपण देशातल्या महिलांच्या सुरक्षेसाठीही तत्पर राहायला पाहिजे. ही जबाबदारी आपलीच आहे. राजपाल यादवने पुढे सांगितलं की, देशाच्या प्रत्येक मुलीला कोणालाही न घाबरता आपले स्वप्न पूर्ण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. जसं हवं तसं जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही मिळाला पाहिजे. इन्स्टाग्रामवरील या पोस्टमध्ये राजपालने त्याच्या मनातील विचार परखडपणे मांडले आहेत. देवीच्या आगमनाच्यानिमित्ताने कन्या पूजन परंपरेचा उल्लेख करताना राजपालने प्रश्न उपस्थित केला की, लहान मुलींना देवीचे रुप मानले जाते, त्यांची पूजा केली जाते, पण खरंच त्या मुली प्रत्यक्षात सुरक्षित आहेत का?

राजपालची नेमकी पोस्ट काय?

“नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण देवी शक्तीची पूजा करतो. आठव्या आणि नवव्या दिवशी आपण लहान मुलींना देवी मानून त्यांची पूजा करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. पण जेव्हा महिलांच्या सुरक्षेशी संबंधित घटना उघडकीस येतात, तेव्हा हा प्रश्न उपस्थित होतो: ज्या देशात लहान मुलींना देवी मानले जाते, तिथे प्रत्येक मुलगी खरोखरच सुरक्षित आहे का? तीन मुलींचा बाप म्हणून हा प्रश्न मला खूप खोलवर सतावत असतो. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलीने निर्भयपणे आपली स्वप्ने पूर्ण करावीत, आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगावे आणि ती जिथे जाईल तिथे तिचा आदर व्हावा.

‘कन्यापूजन हा केवळ एक विधी नाही’

पुढे त्याने लिहिलं की, “मुलींचा बाप म्हणून हा प्रश्न माझ्यासाठी अधिकच भावनिक आणि आहे. प्रत्येक वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलीने निर्भयपणे आपली स्वप्ने पूर्ण करावीत, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगावे आणि सर्वत्र तिचा आदर व्हावा. देवी दुर्गेची उपासना तेव्हाच खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरेल, जेव्हा आपण तिची शक्ती केवळ मंदिरांमध्येच नव्हे, तर प्रत्येक स्त्रीबद्दल आदर बाळगून आणि तिची सुरक्षा सुनिश्चित होईल. या नवरात्रीत, आपण केवळ देवीच्या पूजेपुरते स्वतःला मर्यादित ठेवू नये. आपल्या मुलींना धैर्याने जगायला शिकवण्याचा आणि त्यांना असे जग देण्याचा संकल्प करूया, जिथे त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी दररोज संघर्ष करावा लागणार नाही. कारण कन्यापूजन हा केवळ एक विधी नाही, तर तो आपल्याला प्रत्येक मुलीच्या सन्मानाचे आणि हक्कांचे रक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीची आठवण करून देतो”, असं राजपालने म्हटलं आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु