Sonu Sood | ‘एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण चुकणार नाही!’ सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!

| Updated on: Mar 11, 2021 | 10:29 AM

सोनू देशाचे भविष्य उत्तम बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. आधी मुलांना शिष्यवृत्ती दिल्यानंतर आता सोनूने ऑनलाईन क्लासेससाठी मुलांना मोबाईल फोन देण्याचे ठरवले आहे.

Sonu Sood | ‘एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण चुकणार नाही!’ सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!
सोनू सूद
Follow us on

मुंबई : लॉकडाऊनमध्ये ‘मसीहा’ म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) कोणालाही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. लॉकडाऊन दरम्यान त्याने कोट्यवधी लोकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. तो अजूनही न थांबवता लोकांची मदत करत आहे. आता, सोनू देशाचे भविष्य उत्तम बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. आधी मुलांना शिष्यवृत्ती दिल्यानंतर आता सोनूने ऑनलाईन क्लासेससाठी मुलांना मोबाईल फोन देण्याचे ठरवले आहे. ज्या मुलांना फोन स्मार्ट फोन खरेदी करता येणार नाहीत, त्यांना हे मोबाईल देण्यात येतील. स्वत: सोनूने याबाबत माहिती दिली आहे (Bollywood Actor Sonu sood promise to give mobile phones to children for online education).

एका शिक्षण संस्थेने ट्विट करून सोनू सूदकडे मदत मागितली होती. मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, म्हणून त्यांनी मुलांसाठी मोबाईल फोनची मागणी केली. त्यांनी ट्विट केले की, ‘पूजा, अफिया रोजंदारीवर मजुरी करणारी मुले आहेत. ही मुले ऑनलाईन वर्गात उपस्थित राहण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी आपण एक मोबाईल फोन प्रदान करावा.’

सोनू सूद यांचे ट्विटः

सोनू सूद यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, ‘कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आपल्या सर्वांना फोन पाठवत आहे.’ सोनू सूदच्या या ट्विटनंतर प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे.

फसवणूक करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल!

सोनू सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत करणाऱ्या सोनूने त्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘सोनू त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कर्ज देत आहे’, असा मेसेज व्हायरल होत होता. पण, सोनूला याची माहिती मिळताच त्याने तातडीने सोशल मीडियावर चाहत्यांना सावधानीचा इशारा दिला. सोनू म्हणाला की, त्याचे फाउंडेशन असे कोणतेही कर्ज देत नाही किंवा जो असे करतो तो त्याच्या संस्थेशी संबंधित नाही. सोनू सूद यांनी या फसवणूक करणार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे (Bollywood Actor Sonu sood promise to give mobile phones to children for online education).

चार मुलींनी घेतले दत्तक!

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील आपत्तीमुळे बरेच लोक बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा मदतीसाठी हात वर केला आहे. चमोली दुर्घटनेत ग्रस्त कुटुंबातील मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय सूदने घेतला आहे. टिहरी जिल्ह्यातील डोगी पट्ट्यात राहणाऱ्या कुटूंबाला त्याने मदतीचा हात दिला आहे. त्यांनी या कुटुंबातील चार मुलींना दत्तक घेतले आहे. या मुलींचे वडील दुर्घटनेत मारले गेले. आलम सिंगच्या चार मुलांना त्यांच्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी दत्तक घेण्याचे आश्वासन सोनू सूद यांनी दिले आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सोनू सूद सध्या आपला आगामी चित्रपट ‘किसान’च्या निमित्ताने चर्चेत आहेत. सोनूचा हा चित्रपट ई निवास दिग्दर्शित असून, राज शांडिल्य निर्मित करणार आहेत. या चित्रपटाशिवाय सोनू सूद यशराजच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटातही दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

(Bollywood Actor Sonu Sood promise to give mobile phones to children for online education)

हेही वाचा :

TMKOC | ‘तारक मेहता…’च्या ‘रीटा रिपोर्टर’चा बिकिनीत जलवा, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो शेअर करत म्हणाली…

Roohi Box Office Prediction | राजकुमार-जान्हवीची जोडी प्रेक्षकांना भावणार? ‘रूही’ पहिल्याच दिवशी जमवेल इतका गल्ला…