
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आयुष्यात नेमके काय सुरू आहे, यावर चाहत्यांच्या बारीक नजरा आहेत. काही दिवसांपूर्वीच लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत विमानतळावर ऐश्वर्या स्पॉट झाली. 2007 मध्ये ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. अनेक वर्ष सुखाचा संसार सुरू असतानाच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेने रान उठले. मात्र, यावर ना कधी ऐश्वर्या, अभिषेक किंवा बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. अभिषेकसोबत फार जास्त कुठे ऐश्वर्या दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अभिषेकला त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी ऐश्वर्या राय उपस्थित नव्हती. यादरम्यान अभिषेक बच्चन हा ऐश्वर्याचे नाव घेताना दिसला.
शक्यतो ऐश्वर्या राय असो किंवा अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबाबद्दल फार कमी बोलतात. कुटुंबातील गोष्टींबद्दल अजिबातच चर्चा करत नाहीत. ऐश्वर्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती सासरे अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना दिसली. सासऱ्यांबद्दल पहिल्यांदाच खुलासा करताना ऐश्वर्या राय दिसली. नेमके तिचे आणि अमिताभ बच्चन यांचे नाते कसे आहे हे तिने सांगितले.
मुलाखतीमध्ये ऐश्वर्या रायला विचारण्यात आले की, प्रसिद्ध अभिनेते आणि तुझे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत कसे नाते आहे? यावर उत्तर देताना ऐश्वर्या रायने म्हटले होते की, मी त्यांचा आदर, सन्मान करते आणि ते खूप जास्त चांगले आहेत. माझ्यासाठी ते वडील आहेत. ज्या पद्धतीने मला स्वीकारण्यात आले आणि प्रेम देण्यात आले त्याबद्दल मी खरोखरच त्यांची आभारी आहे.
यादरम्यान बच्चन कुटुंबाबद्दल बोलतान ऐश्वर्या राय दिसली. ऐश्वर्या राय हिने ही मुलाखत काही वर्षांपूर्वी दिली होती आणि पहिल्यांदाच ती स्पष्टपणे बच्चन कुटुंबियांबद्दल बोलताना दिसली. अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबियांसोबत दिसली होती. अमिताभ बच्चन हे आपल्यावर एका मुलीसारखे प्रेम करतात, असे एका मुलाखतीमध्येही ऐश्वर्या राय हिने म्हटले होते. लग्नानंतरही ऐश्वर्या राय काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसली आहे.