AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिचा सासू जया बच्चन यांना धक्का, थेट मोठा निर्णय घेत आंध्र प्रदेशच्या…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अभिनेत्री खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलेले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. त्यामध्येच आता ऐश्वर्याने मोठा निर्णय घेतला.

ऐश्वर्या राय हिचा सासू जया बच्चन यांना धक्का, थेट मोठा निर्णय घेत आंध्र प्रदेशच्या...
Aishwarya Rai
| Updated on: Nov 19, 2025 | 1:52 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय विभक्त होणार असल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसतंय. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांकडून भाष्य करणे कायमच टाळले गेले. पहिल्यांदाच आता ऐश्वर्या राय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर दिसलीये. दिवंगत आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच ऐश्वर्या राय देखील मंचावर उपस्थित होती. यापूर्वी कधीही नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर ऐश्वर्या दिसली नाही. ऐश्वर्या राय नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर दिसल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय देखील सत्य साई बाबांची मोठी भक्त आहे. सत्य साई बाबांच्या सल्ल्यानुसार तिने आयुष्यातील अनेक मोठे निर्णय घेतले. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय आणि आई वृंदा राय हे देखील सत्य साई बाबांचे भक्त होते. 1991 मध्ये  ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकला तेव्हा तिने बाबांचे आशीर्वादही घेतले. हेच नाही तर अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी तिने सत्य साई बाबांचा सल्ला घेतला होता.

सत्य साई बाबांच्या सल्ल्यानंतरच तिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ऐश्वर्या राय आध्यात्मिक गुरू सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभात पोहोचली होती. यावेळी तिने मनातील भावना देखील व्यक्त केल्या. ऐश्वर्याच्या आयुष्यात सत्य साई बाबांची एक वेगळी आणि खास जागा आहे. त्यामुळे ती आंध्र प्रदेशच्य कार्यक्रमात पोहोचली होती.

जया बच्चन समाजवादी पार्टीच्या खासदार असून त्या बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ऐश्वर्या राय भाषण करताना दिसली. यादरम्यान तिने सत्य साई बाबा यांचे स्थान तिच्या जीवनात नेमके काय आहे हे सांगितले. ऐश्वर्या राय भाषण करताना भावूक होताना देखील दिसली. नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहून ऐश्वर्याने मोठा धक्का जया बच्चन यांना दिल्याचे लोक बोलत आहेत.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला