AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चन कुटुंबियांच्या सूनेच्या संस्कारांचे काैतुक, भर मंचावर ऐश्वर्याने घेतला आशीर्वाद, पीएम नरेंद्र मोदींबद्दल थेट म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे सातत्याने चर्चेत असलेले नाव आहे. ऐश्वर्या राय फक्त तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत असते. नुकताच ऐश्वर्या नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

बच्चन कुटुंबियांच्या सूनेच्या संस्कारांचे काैतुक, भर मंचावर ऐश्वर्याने घेतला आशीर्वाद, पीएम नरेंद्र मोदींबद्दल थेट म्हणाली...
Narendra Modi and Aishwarya Rai
| Updated on: Nov 19, 2025 | 5:30 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तूफान चर्चेत आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला ऐश्वर्या राय उपस्थित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मंचावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पहिल्यांदाच ऐश्वर्या मंचावर दिसली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने जाती धर्मावर यादरम्यान मोठे विधान केले. ऐश्वर्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाय पडून आर्शिवाद घेताना दिसली. आता ऐश्वर्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक ऐश्वर्याचे काैतुक करताना दिसत आहेत. सासू जया बच्चन कायमच भाजपावर टीका करताना दिसतात. मात्र, सून ऐश्वर्या नरेंद्र मोदींचे आर्शिवाद घेताना दिसली.

ऐश्वर्या राय हिने म्हटले की, फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मानवतेची जात… फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा धर्म… फक्त एकच भाषा आहे, ती म्हणजे हृदयाची भाषा आणि फक्त एकच देव आहे… जे सर्वत्र आहे. पुढे ऐश्वर्या राय हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत म्हटले की, पीएम नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानू इच्छिते की, कारण ते आमच्यासोबत इथे समारोहात पोहोचले.

नरेंद्र मोदी यांनी इथे पोहोचून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी त्यांचे प्रेरणादायी शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तुमची उपस्थिती या जन्मशताब्दी सोहळ्याला अधिक पवित्र आणि खास बनवत आहे. पुढे ऐश्वर्या म्हणाली की, आपल्याला स्वामींच्या संदेशाची आठवण करून देते की खरे नेतृत्व म्हणजे सेवा मानवतेची सेवा करणे ही देवाची सर्वात मोठी सेवा आहे, असेही ऐश्वर्या रायने म्हटले.

यानंतर भाषण करून आपल्या जाग्यावर बसण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ पोहोचते आणि त्यांच्या पाय पडते. ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून तिचे काैतुक करत आहेत. जया बच्चन यांना टार्गेट करत काहींनी म्हटले की, सूनेकडून संसार शिकण्याची वेळ सासूवर आलीय.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.