Bollywood | फिल्मी कुटुंबात जन्म, १० वर्ष मोठ्या पुरुषाशी लग्न करत झाली राजघराण्याची सून; ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं

Bollywood | सगळ्यांचा विरोध करत अभिनेत्रीने केलं १० वर्ष मोठ्या पुरुषाशी लग्न करत झाली राजघराण्याची सून, फोटोत दिसणारी 'ही' अभिनेत्री आज जगते रॉयल आयुष्य... फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखळं... अभिनेत्री आज करतेय बॉलिवूडवर राज्य...

Bollywood | फिल्मी कुटुंबात जन्म, १० वर्ष मोठ्या पुरुषाशी लग्न करत झाली राजघराण्याची सून; या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं
| Updated on: Sep 22, 2023 | 2:29 PM

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | लहनापणीच्या फोटोंचं आकर्षण प्रत्येकाला असतं. आपण लहन असताना कसे दिसत होतो, लहान असताना काय करायचो इत्यादी गोष्टी आपल्याला आई – वडील, आजी – आजोबांकडून कळत असतात. सेलिब्रिटींचे देखील सोशल मीडियावर लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. अभिनेत्री पहिला सिनेमा फ्लॉप ठरला. पण तरी देखील अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांसोबत झळकल्यानंतर फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

फिल्मी कुटुंबात जन्म झाल्यामुळे अभिनेत्री लहानपणापासून अभिनयाचे धडे गिरवत होती. ज्यामुळे तिला एक उत्तम अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यास भरपूर मदत झाली. ज्या कुटुंबात अभिनेत्रीचा जन्म झाला, त्या कुटुंबातील महिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करत नव्हत्या. कुटुंबातून फक्त अभिनेते झगमगत्या विश्वात यायचे. अशात सर्व परंपरा मोडत अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि स्वतःची भक्कम ओळख निर्माण केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री करीना कपूर आहे. राज कपूर यांचे पूत्र रणधीर कपूर आणि बबीता कपूर यांच्या घरी करीना कपूर हिने जन्म घेतला. मात्र, करीना आणि तिची मोठी बहीण करिश्मा यांची आई बबिता यांच्या देखरेखीखाली वाढ झाली. दोघी बहिणी लहान असताना बबीता वेगळीकडे राहायच्या.

करिश्माने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा कुटुंबात अनेक वाद झाले. पण करिश्मानंतर करिनाने ही परंपरा पूर्णपणे बदलून टाकली. करिनाने बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम केले आणि एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले. अभिषेक बच्चनसोबतचा रेफ्युजी हा तिचा पहिला सिनेमा होता. करीनाचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला. पण तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना करीना हिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता सैफ अली खान याची एन्ट्री झाली. दोघांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. तेव्हा सैफ दोन मुलांचा बाबा होता. पण त्याचं घटस्फोट झालं होतं.

सैफ याच्यासोबत लग्न करू नको.. असा सल्ला अभिनेत्रीला अनेकांनी दिला. पण करीना फक्त आणि फक्त तिच्या मनाचं ऐकलं आणि सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं आणि राजघराण्याची सून झाली. लग्नानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म दिला. आज अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आहे.