माधुरी दीक्षितचा लेक जगातील बड्या कंपनीत कामाला, आईने सांगितलं सर्वकाही..

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पहिल्यांदाच तिच्या मुलांबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेत्रीचा पती काय करतो, हे सर्वांनाच माहिती आहे पण तिचे दोन्ही मुले सध्या काय करतात, याबाबत कोणालाही फार काही कल्पना नाही. आता त्यावर स्वत: अभिनेत्री खुलासा केला.

माधुरी दीक्षितचा लेक जगातील बड्या कंपनीत कामाला, आईने सांगितलं सर्वकाही..
Madhuri Dixit son
| Updated on: Oct 22, 2026 | 4:21 PM

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तूफान चर्चेत आहे. डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतर पुन्हा 2011 मध्ये अभिनेत्री भारतात परतली. अभिनेत्रीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. नेहमीच सर्वांना प्रश्न पडतो की, अभिनेत्रीची मुले काय करतात. कलाकारांची मुले कलाकार होणे हे बॉलिवूडमध्ये कायमच बघायला मिळते. मात्र, या गोष्टी फाट्यावर मारत माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आई बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आणि वडील डॉक्टर असतानाही त्या दोघांनीही असे क्षेत्र निवडले, त्याचा साधा विचारही कोणी करणार नाही. माधुरीच्या एका मुलाचा जन्म 2003 मध्ये झाला तर दुसऱ्या मुलाचा जन्म 2005 मध्ये झाला. मोठ्या मुलाचे नाव अरिन तर छोट्या मुलाचे नाव रायन आहे. दोघांचाही जन्म अमेरिकेतील डेन्व्हर इथे झाला. दोघांचेही शिक्षण अमेरिकेत झाले.

अरिनने अमेरिकेतील प्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया येथील विटरबी स्कूलमध्ये इंजिनिअरिंग केले. त्याने फेसबुकच्या मार्केटिंग टीमसोबत काम केले. सध्या माधुरी ही कोण होणार करोडपती या शोमध्ये दिसत आहे. जवळपास लोकांना माहिती आहे की, माधुरीचा नवरा काय करतो. पण तिचे दोन्ही मुले सध्या काय करतात, याबाबत कोणालाही काही कल्पना नाही.

Loading...

कोण होणार करोडपती शोमध्ये प्रिया बेर्डे सहभागी झाली होती, त्यावेळी तिने माधुरी दीक्षित हिला विचारले की, तुझी मुले सध्या काय करतात? त्यावर माधुरी आपल्या मुलांबद्दल सांगताना दिसली. आता मोठी झाली आहेत ती. गेल्याच वर्षी मोठा पदवीधर झाला आणि तो आता अ‍ॅपल कंपनीत कामाला आहे. छोटा डिसेंबरमध्ये पदवीधर होईल, त्यापूर्वीच त्याने त्याच्या दोन मित्रांसोबत स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

तो रोबोटिक्स क्षेत्रातील एका स्टार्टअपमध्ये को फाऊंडर आहे. आई इतकी प्रसिद्ध अभिनेत्री असतानाही दोन्ही मुलांनी करिअर वेगळे निवडले आणि त्याकरिता दोघेही मेहतन घेत आहेत. माधुरी दीक्षित आणि तिचा नवरा भारतात आहेत. माधुरीने पुन्हा नव्या दमाने आपल्या कामाला सुरूवात केली. अभिनेत्रीची दोन्ही मुले अमेरिकेतच राहतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us