मी तर तिला… बिग बॉसच्या घरात माही विजचे धक्कादायक विधान, थेट आईनेच..
अभिनेत्री माही वीज हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सध्या ती बिग बॉस 20 मध्ये सहभागी झाली. विशेष म्हणजे माही तूफान चर्चेत आहे. माही वीज ही बिग बॉसच्या घरात चांगलीच रडताना दिसत आहे.

बिग बॉस 20 चांगलेच रंगात आले. मोठे आरोप केले जात आहेत. यंदाचा आठवडा भावनिक बघायला मिळाला. 2 महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा कोणाताही संपर्क नाही. त्यातच आता दिवाळीनिमित्त आपल्या घरच्यांचा आवाज ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. तब्बल दोन महिन्यानंतर ते घरच्यांचा आवाज ऐकतील. आपल्या घरच्यांचा आवाज ऐकून घरातील स्पर्धेक भावूक झाले. त्यातच आता माही विजचा मोठा गेम झाला. लव गिलच्या आईने माही गिलचा बुरखा फाटला. लवच्या आईने आपल्या लेकीवर प्रेम व्यक्त करत माहीला चांगलेच सुनावले. लवच्या आईने रागात म्हटले की, माही माझ्या वयाची आहे. माहीने काहीही बोलण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा. माहीने म्हटले की, स्काउट नसता तर मी तिला उघडे केले असते… आपल्या आईने हे सांगितल्यावर अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. ती रडताना दिसली.
त्यानंतर ती बाहेर येते आणि माहीला याबाबत विचारते. यानंतर माही म्हणते की, मी असे काही बोललेच नाही. त्यानंतर माही विज रडताना दिसत आहे. रडत रडत बाथरूममध्ये यावेळी माही विज काही गंभीर आरोप करते. माही विज रडत रडत म्हणते की, मला शोच्या निर्मात्यांकडून टार्गेट केले जात आहे. इथे शोमध्ये सर्वचजण एकमेकांविरोधात बोलतात.
पण माझेच दाखवले जाते. माझेही कुटुंबिय आहेत. माझी चुकीची इमेज दाखवली जात आहे. मला आता शोमध्ये राहायचे नाही. मला एकही पैसा नको, मी शो सोडून जाईल. माही विज हिला समजवताना घरातील इतर सदस्य दिसत आहेत. बाथरूममधून बाहेर आल्यानंतरही माही विज रडताना दिसत आहे.
आता माही विज हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माही विज निर्मात्यांकडून मला टार्गेट केले जात असल्याचे म्हणताना दिसत आहे. आता माही खरोखरच गेम सोडणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. माही विज चांगलीच रडताना दिसत आहे. अनेकजण माहीला यावेळी समजून सांगताना दिसत आहेत.