AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अभिनेत्रीमुळे मोडला जय भानुशाली-माही विजचा संसार? अखेर दिलं स्पष्ट उत्तर

ही अभिनेत्री एकेकाळी माही विजची मैत्रीण होती. मात्र ऑगस्ट महिन्यात दोघींनी एकमेकांना अनफॉलो केलं. त्यानंतर आता जय भानुशालीसोबत नाव जोडलं जात असताना अभिनेत्रीने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

या अभिनेत्रीमुळे मोडला जय भानुशाली-माही विजचा संसार? अखेर दिलं स्पष्ट उत्तर
जय भानुशाली, माही विज, सना मकबूलImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 11:18 AM
Share

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर माही बिग बॉस या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली असून तिच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. जय आणि माही यांनी इतकी वर्षे संसार केल्यानंतर त्यांचा घटस्फोट का झाला, असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला. त्यातच ‘बिग बॉस ओटीटी 3’च्या विजेतीचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे. सोशल मीडियावर जय भानुशालीसोबत तिच्या कथित जवळिकीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर आता अभिनेत्रीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. इतकंच नाही, तर माही विजसोबतच्या मैत्रीबद्दलही तिने स्पष्ट भूमिका मांडली आहे.

जयसोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडलं जातं आहे, ती दुसरी-तिसरी कोणी नसून सना मकबूल आहे. माही विज आणि जय भानुशाली यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चा सुरू असताना एका सोशल मीडिया युजरने सनाला लक्ष्य केलं. जयसोबत सतत फिरत असल्याचा आरोप करत त्या युजरने सनाला ‘होमरेकर’ अर्थात दुसऱ्याचं घर मोडणारी महिला, असं म्हटलं. या आरोपांनंतर आता सनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर उत्तर दिलं आहे. ‘जयसोबत फिरते? कधी आणि कुठे? ट्रोलर्स, मलाही सांगा! मी कोणत्या एक्स-हसबंडसोबत फिरतेय?’ असा उलट सवाल तिने टीकाकारांना केला आहे. माझ्याविरोधात बोलणाऱ्यांनी आधी आरोपांचा आधार स्पष्ट करावा, असंही तिने स्पष्ट केलं.

सना मकबूलची पोस्ट-

या वादात सनाने माही विजसोबतच्या मैत्रीबद्दलही महत्त्वाचं विधान केलं. सोशल मीडियावर माहीला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सूचित करणाऱ्या एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना सनाने म्हटलं की, माही तिची बेस्ट फ्रेंड नव्हती, तर केवळ मैत्रीण होती. सना आणि माही यांच्यात एकेकाळी चांगली मैत्री होती. मात्र, ऑगस्ट 2026 च्या सुमारास दोघींनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर सनाने एका जुन्या मैत्रिणीबद्दल केलेल्या सूचक पोस्टमुळेही चर्चांना उधाण आलं. तिने कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, तरी नेटकऱ्यांनी या पोस्टचा संबंध माहीशी जोडला.

दरम्यान, ‘बिग बॉस 20’मध्ये सहभागी झालेल्या माही विजने जय भानुशालीपासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. मुलगी ताराच्या भविष्यासाठी स्वतःच्या कमाईवर उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगताना तिने पोटगी किंवा आर्थिक देखभालीसाठी पैसे मागितले नसल्याचं स्पष्ट केलं. जयने आर्थिक मदत करण्यास कधीही नकार दिला नव्हता, असंही माहीने सांगितलं. मात्र, तिला स्वतःच्या कष्टांवर मुलीचं भविष्य सुरक्षित करायचं आहे. तिच्या या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर सना मकबूलचं नाव पुन्हा चर्चेत आलं.

Follow Us
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं