Mahhi Vij: माही विजने पोटगी नाकारल्याचा खुलासा करताच बेस्ट फ्रेंडचा टोला; म्हणाली ‘रोजचा ड्रामा सुरू..’

माही विजच्या भावनिक खुलाशानंतर सनाच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. माहीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे चाहते आहेत, तर सनाच्या पोस्टचा अर्थ लावणारेही अनेक जण आहेत.

Mahhi Vij: माही विजने पोटगी नाकारल्याचा खुलासा करताच बेस्ट फ्रेंडचा टोला; म्हणाली रोजचा ड्रामा सुरू..
Mahhi Vij and Jay Bhanushali
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2026 | 2:04 PM

Mahhi Vij: ‘बिग बॉस 20’च्या घरात सध्या स्पर्धकांच्या खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री माही विज तिचा पूर्व पती जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाबद्दल आणि पोटगी न घेण्याच्या निर्णयाबद्दल सांगताना भावूक झाली. तिच्या या वक्तव्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी 3’ची विजेती सना मकबूल हिने सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने एका स्पर्धकावर स्वतःला पीडित दाखवण्याचा आणि महान असल्याचा आव आणण्याचा आरोप केल्याचं म्हटलं जात आहे. सनाने कोणाचंही नाव घेतलेलं नसलं, तरी तिचा रोख माही विजकडे असल्याचा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे एकेकाळच्या जवळच्या मैत्रिणींमधील वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

माही विज पोटगीबद्दल बोलताना झाली भावूक

‘बिग बॉस 20’च्या भागात माही विजने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटादरम्यान तिने पोटगी न घेण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या विषयावर बोलताना माहीला अश्रू अनावर झाले. माहीने सांगितलं की, ती तिच्या मुलीच्या भविष्यासाठी स्वतः मेहनत घेऊन आर्थिक सुरक्षितता निर्माण करू इच्छिते. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान न्यायाधीशांनी तिला पोटगी स्वीकारण्याबाबत अनेकदा विचारलं होतं, मात्र तिने ती नाकारली. जयने मेहनत करून कमावलेले पैसे असल्यामुळे ते स्वीकारण्याची इच्छा नसल्याचं तिने स्पष्ट केलं. जयने तिला पैसे घेण्यास मनाई केली नव्हती, असंही तिने सांगितलं.

Loading...

सना मकबूलचा माहीला टोला

माहीच्या या भावनिक खुलाशानंतर सनाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने लिहिलं, ‘एक महत्त्वाची अपडेट, तर एका विशिष्ट स्पर्धकाचा ‘डेली सोप’ (रोजचा ड्रामा) सुरू झाला आहे, जी पीडितेची आणि बिचारी असल्याची भूमिका साकारत आहे. मी किती महान आहे, असं दाखवतेय. हाहाहा.. काय आणि केव्हा करायचं याचा हा नियोजित खेळ आहे.’ सनाच्या या पोस्टमध्ये कोणाचंही नाव नव्हतं. मात्र, पोस्टची वेळ आणि माहीने केलेला भावनिक खुलासा यांची सांगड घालत अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिचा रोख माहीकडे असल्याचा अंदाज व्यक्त केला.

एकेकाळी होत्या जिवलग मैत्रिणी

सना मकबूल आणि माही विज यांची मैत्री एकेकाळी चर्चेत होती. मात्र, कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. दोघींनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचंही वृत्त समोर आलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us