Mahhi Vij: माही विजने पोटगीविषयी खुलासा करताच जय भानुशाली स्पष्टच बोलला; आपल्यामधील पैशाचा विषय..
Jay Bhanushali and Mahhi Vij: माही विजने बिग बॉसच्या घरात पोटगीबद्दल खुलासा करताच आता त्यावर पूर्व पती जय भानुशालीने प्रतिक्रिया दिली आहे. माहीच्या इन्स्टाग्रामवरील रीलवर त्याने कमेंट केली आहे.

‘बिग बॉस 20’च्या एका एपिसोडमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री माही विज तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना भावूक झाली. सिंगल मदर म्हणून मुलगी ताराला वाढवण्यातील आव्हानांविषयी आणि पूर्व पती जय भानुशालीकडून पोटगी नाकारण्याच्या निर्णयाबद्दल ती मोकळेपणे व्यक्त झाली. कोर्टात न्यायाधीशांनी चार वेळा पुनर्विचार करण्याचा आग्रह करूनही मी आर्थिक मदत नाकारली असल्याचं माहीने उघड केलं. तिच्या या दाव्यावर आता जय भानुशालीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. माहीच्या टीमकडून तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर बिग बॉसचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. त्यात माहीला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय. याच व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये जयने प्रतिक्रिया दिली आहे.
जय भानुशालीची प्रतिक्रिया-
‘माही, खंबीर राहा. आपल्याला दोघींनाही माहीत आहे की, कठीण काळात आपण नेहमीच एकमेकींच्या पाठीशी उभे राहू. आपल्यामध्ये पैशाचा विषय कधीच नव्हता आणि भविष्यातही कधी नसेल. तू आणि तारा या दोघीही आयुष्यभर माझी जबाबदारी असाल. आपल्या नात्याचा वैवाहिक दर्जा बदलला म्हणून तुमच्या दोघींबद्दलचं माझं प्रेम आणि आदर कधीच कमी होऊ शकत नाही. मी नेहमीच तुमच्या दोघींसोबत आहे,’ अशा शब्दांत जयने भावना व्यक्त केल्या.
जय भानुशालीची कमेंट-

बिग बॉसच्या घरात माही आणि अरिश्फा खान यांच्यात झालेल्या जोरदार वादानंतर हा भावनिक क्षण आला. माहीने जयकडून मिळणारी आर्थिक मदत का नाकारली होती, हे उघड केलं. “मी पोटगी म्हणून एक पैसाही घेतला नाही किंवा देखभालीची मागणीही केली नाही. मला माझ्या मुलीचं भविष्य स्वत:च्या प्रयत्नांनी सुरक्षित करायचं आहे. पोटगी नाकारण्याच्या माझ्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास न्यायाधीशांनी मला चार वेळा सांगितलं होतं. पण जयने त्याचे पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला ते त्याच्याकडे मागायचे नव्हते. जयनेही मला मदत करण्यास कधीही नकार दिला नव्हता. त्याचं संपूर्ण लॉकर माझ्यासाठी खुलं आहे. पण ते त्याच्या कष्टाचे पैसे आहेत. त्याने 16-16 तास काम करून ते कमावले आहेत”, असं माही म्हणाली होती.
माहीचा व्हिडीओ-
View this post on Instagram
जय आणि माही यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर विभक्त होण्याची घोषणा केली. नोव्हेंबर 2011 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये या दोघांनी एकत्र पोस्ट शेअर करत घटस्फोट जाहीर केला.
