अचानक सीएनजीच्या दरात मोठी वाढ, वाहनधारकांमध्ये नाराजी, मोठं कारण समोर
मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सतत किंमती वाढताना दिसत आहेत. त्यातच सीएनजी ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा झटका बसल्याचे बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा वाढ झाली.

नंदुरबार जिल्हामध्ये पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झालीय. 100 रुपये प्रती किलो असलेला सीएनजी अचानक 105 रूपये झाल्याने वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजीचे सुर उमटताना दिसताहेत. नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सिमेलगत असून शेजारील गुजरातच्या जिल्हात हाच सीएनजी 10 रूपयांनी स्वस्त आहे. दोन राज्यातील लगतच्या दोन जिल्हामध्ये सीएनजीच्या दरात असलेल्या फरकावरून वाहनधारकांमध्ये संतापाची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सीएनजीच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे प्रवासी भाडेवाढ होण्याची दाट शक्यता असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे.
सीएनजीचे दर वाढले, वाहनधारकांचे आर्थिक गणित बिघडणार एकीकडे दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे सतत भाव वाढत असताना आता सीएनजीच्या दरातही वाढ झाल्याने त्याचा परिणाम वाहनधारकांच्या खर्चावर होणार आहे. सीएनजी महागल्याने साहजिक वाहतूक खर्च देखील वाढेल आणि भाडेवाढ होईल. परिणामी जे सर्वसामान्य प्रवासी आपला प्रवास टाळण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहनधारकांवर आधीच इतर करांचा बोजा आणि त्यात सीएनजीची दरवाढ झाल्याने वाहनधारकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
शेजारील गुजरातमध्ये सीएनजी दहा रुपयांनी स्वस्त, मग नंदुरबारमध्येच महाग का? महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्हाची सिमा ही गुजरातच्या तापी, नर्मदा आणि सुरतला लागून असून तिथं सीएनजी दहा रुपयांनी स्वस्त आहे. हा जो दोन राज्यातील दरामध्ये फरक दिसतोय त्याचे कारण दोन राज्यातील वेगवेगळे कराचे दर होय. परंतू जर गुजरातमध्ये सीएनजी स्वस्त असेल तर नंदुरबारमध्ये महाग का दिला जातोय असा वाहनधारकांकडून सवाल विचारला जात असून नंदुरबारमधील सीएनजीचे दर कमी करण्याची मागणी केली जातेय.
इराण-अमेरीका युद्ध अन् सीएनजी दरवाढीचा संबंध मागील काही दिवसांमध्ये कच्च्या इंधनाचे दर वाढत आहेत आणि त्याचे थेट परिणाम पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता सीएनजीवर देखील झाल्याचे आपण पाहतोय. या सगळ्याचे मूळ कारण म्हणजे इराण-अमेरीका युद्ध हे आहे. एकंदरीत, नंदुरबार जिल्हामध्ये सीएनजीच्या दरात 5 रूपयांनी झालेली दरवाढ वाहनधारकांचे आर्थिक गणित बिघडवणार असून पुढील काळात आणखी काही दरवाढ होणार का हे आगामी काळात समजेलच.
