‘अजिबात लाज नाही’, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्रीने ओलांडल्या मर्यादा; आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट, प्रचंड ट्रोल

एका बॉलिवूड अभिनेत्रीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीने चक्क सोशल मीडियावर तिचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

अजिबात लाज नाही, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्रीने ओलांडल्या मर्यादा; आंघोळीचा व्हिडिओ पोस्ट, प्रचंड ट्रोल
Bollywood Actress Megha Shukla Shower Video Goes Viral, Sparks Huge Backlash
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2025 | 2:24 AM

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींच्याबाबत अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे त्या ट्रोल होतात. कधी कधी तर अभिनेत्रींचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात किंवा प्रमोशनचा भाग म्हणून ते व्हायरल केले जातात. अशाच एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका अभिनेत्रीने चक्क तिचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

थेट अंघोळ करतानाचा व्हिडीओ पोस्ट 

ही अभिनेत्री आहे ‘कथल’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली मेघा शुक्ला. मेघाने याधाही बोल्डनेसची मर्यादा पार केली आहे. तिने याआधीही तिने बोल्ड फोटो पोस्ट करून ट्रोलिंगची शिकार बनली आहे. तिची स्टाईल कोणापासूनही लपलेली नाही. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटची झलक तिच्या चाहत्यांना दाखवत असते. तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करण्यात ती अजिबात कचरत नाही. मेघा शुक्ला कधीकधी अत्यधिक बोल्ड अ‍ॅक्टिव्हिटी दाखवून सोशल मीडियावर खळबळ उडवते. तिने स्वतःचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच तिच्यावर जोरदार टीकाही झाली. तिने बाथरूममध्ये आंघोळ करताना स्वतःची एक झलक दाखवली आहे.

अभिनेत्री प्रचंड ट्रोल

मेघा शुक्लाचे इंस्टाग्रामवर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर होताच व्हायरल होतात. मेघा शुक्लाचा बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडतो आणि ते सुंदर प्रतिक्रिया देतात. मात्र तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मेघा शुक्लाने आंघोळीचा व्हिडिओ शेअर केल्यानं सोशल मीडियावर तिला जोरदार फटकारण्यात आलं.


‘अजिबात लाज उरली नाही’

एका युजरने लिहिले आहे की, ‘अजिबात लाज उरली नाही.’ तर, एका युजरने लिहिले आहे की, ‘आंघोळ करताना व्हिडिओ कोण शेअर करते.’ एका युजरने म्हटलं आहे की, ‘तुम्हाला तुमचे शरीर दाखवून प्रसिद्ध व्हायचे आहे का?’ अशा पद्धतीने तिने ट्रोल करण्यात येत आहे.

 चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

मेघा शुक्लाच्या ‘कथल’ या चित्रपटाला 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तिच्याशिवाय या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विजय राज, राजपाल यादव, ब्रिजेंद्र काला, रघुवीर यादव असे कलाकार दिसले. ‘कथल’ चित्रपटाव्यतिरिक्त मेघा शुक्लाने अनेक वेब सिरीजमध्येही काम केलं आहे.