एका वर्षात 8 सुपरहिट सिनेमे, या अभिनेत्रीने श्रीदेवी-माधुरीलाही टाकले मागे

सध्या बॉलिवूडमधील एक अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने वर्षभरात आठ सुपरहिट सिनेमे दिले आहेत. या अभिनेत्रीने माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीलाही मागे टाकले आहे. हा अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया...

एका वर्षात 8 सुपरहिट सिनेमे, या अभिनेत्रीने श्रीदेवी-माधुरीलाही टाकले मागे
Bollywood Actress
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 11:52 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीत स्टार्स हिट होण्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई. पण कधी कुणाचा सिनेमा चालेल, हे कोणालाही माहीत नसते. अनेकदा स्टार्स वर्षानुवर्षे काम करतात, तरीही त्यांचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकत नाही. पण आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने आपल्या पहिल्याच चित्रपटापासून थिएटरवर कब्जा केला होता. इतकेच नव्हे, तर या अभिनेत्रीने एकाच वर्षात ८ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चला जाणून घेऊया ती कोण आहे?

पहिल्याच चित्रपटासाठी जिंकला फिल्मफेअर अवॉर्ड

Loading...

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला स्टुडिओत झाडू मारण्यापासून ते जमिनीवर केलेली घाण साफ करण्यापर्यंतची कामे केली होती. आम्ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबद्दल बोलत आहोत. रवीना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. रवीना यांनी १९९१ मध्ये आलेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, जो सुपरहिट ठरला होता. पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

रवीना यांच्या नावावर नोंदवला हा विक्रम

रवीना यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे, जो आजतागायत ना श्रीदेवी तोडू शकल्या, ना माधुरी दीक्षित. होय, रवीना बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने एकाच वर्षात ८ ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. होय, १९९४ या वर्षात रवीनाचे ‘मोहरा’, ‘लाडला’, ‘दिलवाले’, ‘आतिश’ आणि ‘अंदाज अपना अपना’ यांसारखे चित्रपट आले आणि तिने एकाच वर्षात ८ सुपरहिट चित्रपट दिले. रवीनाचा हा विक्रम माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांसारख्या अभिनेत्रीही तोडू शकल्या नाहीत.

शाहरुख आणि अजय यांच्यासोबतच्या चित्रपटांचे ऑफर नाकारले

२०२३ मध्ये एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलताना रवीना यांनी सांगितले की, मॉडेलिंगच्या दिवसांत त्यांना सातत्याने चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. पण अभिनयात त्यांना फारशी रूची नव्हती. त्यांनी सांगितले होते की, यश चोपडा यांच्या ‘डर’ या चित्रपटासाठी त्या पहिल्या पसंतीच्या होत्या, ज्यात नंतर शाहरुख खान, सनी देओल आणि जूही चावला यांनी काम केले. मात्र, त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. कारण त्यांना काही सीन्स करायचे नव्हते. इतकेच नव्हे, तर ‘प्रेम कैदी’, ज्यातून करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाची ऑफर रवीनाला आली होती. तसेच रवीनाने अजय देवगणचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’लाही नकार दिला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us