गडगंज श्रीमंत होती रेखा यांची सावत्र आई, नवऱ्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, दारूच्या आहारी जाताच 19 महिने कोमात त्यानंतर…
अभिनेत्री रेखा यांच्या वडिलांनी कधीच त्यांना मुलीचा दर्जा दिला नाही, तर त्यांची सावत्र आई होती गडगंज श्रीमंत, पण शेवटचे क्षण ठरले अत्यंत कठीण... एका चुकीच्या निर्णयामुळे आणि दारूच्या व्यसनामुळे सर्वकाही झालं उद्ध्वस्त...

अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण रेखा यांच्या सावत्र आईने देखील आयुष्यात अनेक यातना सोसल्या आहेत. रेखा यांच्या सावत्र आईने त्याकाळी जवळपास 250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. पण विवाहित जेमिनी गणेशन यांच्यासोबत लग्न करणं त्यांची सर्वात मोठी चूक ठरली… रेखा यांच्या सावत्र आई सावित्री यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या त्या काळात सर्वात जास्त फी घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्यांसोबत सावित्री यांनी स्क्रिन शेअर केली. सावित्री गडगंड श्रीमंत होत्या. असं म्हणतात की, त्या दागिने तोलूनच दान करायच्या.
पण सावित्री यांच्या आयुष्यात वाईट वळण तेव्हा आलं, जेव्हा त्यांची ओळख जेमिनी गणेशन म्हणजे, रेखा यांच्या वडिलांसोबत झाली. गणेशन आधीच विवाहित होते एवढंच नाही तर, अन्य महिलांसोबत देखील त्यांचे प्रेमसंबंध होते. सावित्री यांच्या काकांनी दोघांच्या नात्याला तिव्र विरोध केलेला, पण तरी देखील सावित्री यांनी गणेशन यांच्यासोबत गुपचूप 1952 रोजी लग्न केलं. त्यानंतर 1956 मध्ये सर्वांना सावित्री आणि गणेशन यांच्या लग्नाबद्दल कळलं.
जेमिनी गणेशन यांचे लग्नानंतर देखील अन्य महिलांसोबत संबंध होते आणि ते कधी सुधारलेच नाही. गणेशन यांच्या प्रत्येक अफेअरबद्दल सावित्री यांना कळायचं… वैवाहिक जीवनातील या विश्वासघातांनी सावित्रीला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. त्यांच्या पतीच्या बेवफाईमुळे त्या हळूहळू दारूच्या व्यसनाच्या आहारी गेली.
1960 पासून सावित्री यांचा वाईट काळ सुरु झाला. त्यांनी स्वतः सिनेमे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पैसे लावले पण त्यांना यश मिळालं नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की, टॅक्स अधिकाऱ्यांनी त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली. अखेर सावित्री यांना स्वतःचं आलिशान घर सोडून दोन खोल्यांच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायला जावं लागलं. अखेर सावित्री यांनी पोटाची भूक आणि गरजा भागवण्यासाठी सिनेमांमध्ये छोटे – मोठे रोल करण्यास सुरुवात केली. कधीकाळी कोट्यवधी रुपयांमध्ये खेळणाऱ्या सावित्री यांच्याकडे आता खर्चासाठी देखील पैसे राहिले नव्हते.
सर्वात धक्कादायक म्हणजे 1980 साली सावित्री अचानक बेशुद्ध झाल्या आणि कोमामध्ये गेल्या. त्या परिस्थितीत जेमिनी गणेशन आले आणि सावित्री यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला. नातेवाईकांनी देखील त्यांचा सांभाळ केला. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नव्हत्या…
अखेर सावित्री यांनी 26 डिसेंबर 1981 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सावित्री यांनी शेवटचे दिवस अत्यंत गरिबीत आणि कोमात घालवले. सावित्रीची कहाणी आजही लोकांच्या डोळ्यात अश्रू आणते.