
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा (Richa Chaddha) हिने 2008 मध्ये आपल्या बाॅलिवूड करिअरला सुरूवात केली. विशेष म्हणजे ज्यावेळी ऋचा चड्ढा ही काॅलेजमध्ये होती, त्याचवेळी तिच्या पहिल्या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली. ऋचा चड्ढा ही थेट काॅलेजमधूनच चित्रपटाच्या सेटवर पोहचायची. ऋचा चड्ढा हिचा ओए लकी लकी ओए हा चित्रपट (Movie) पहिला बाॅलिवूड चित्रपट आहे. यानंतर ऋचा चड्ढा हिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. ऋचा चड्ढा हिने नुकताच एक मुलाखत (Interview) दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करताना ऋचा चड्ढा ही दिसली आहे. आता ऋचा चड्ढा ही प्रोड्यूसर बनली आहे.
मुलाखतीमध्ये मोठा खुलासा करत ऋचा चड्ढा हिने म्हटले की, आता बऱ्याच गोष्टी या बदलल्या आहेत. अगोदर चित्रपटाच्या सेटवर खूप जास्त भेदभाव हा केला जात असतं. इतकेच नाही तर मी देखील त्या भेदभावची एकदा शिकार झाले असल्याचे देखील ऋचा चड्ढा हिने सांगितले आहे. यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ऋचा चड्ढा म्हणाली की, मी ज्यावेळी ओए लकी लकी ओए या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यावेळी मी काॅलेजवरून थेट चित्रपटाच्या सेटवरच जात असत. त्यावेळी बऱ्याच वेळा एका कलाकाराला एक व्हॅनिटी व्हॅन दिली जात नसतं. एक व्हॅनिटी व्हॅन तीन जणांना शेअर करायला सांगितली जायची. मात्र, असे काही कलाकार सेटवर असायचे की, त्यांना एक व्हॅनिटी व्हॅन दिली जात असतं.
एकेदिवशी मी काॅलेजवरून चित्रपटाच्या सेटवर आले. त्यावेळी मला सांगण्यात आले की, दुसरा कलाकार येण्यासाठी थोडासा वेळ आहे तर तुम्ही व्हॅनिटी व्हॅन वापरा काही वेळासाठी. त्यानंतर मी शूटिंग करण्यासाठी गेले. मी शूटिंग करून परत आल्यावर मला अत्यंत मोठा धक्काच बसला. मला काहीच कळत नव्हते.
व्हॅनिटी व्हॅनमध्ये असलेले माझे सर्व साहित्य हे थेट बाहेर फेकून देण्यात आले होते. त्यावेळी त्या साहित्याची मोडतोड देखील झाली होती. त्यानंतर मला काहीच कळत नव्हते. त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर हा भेदभाव कायमच होत असतं. आता तसे राहिले नाहीये. कारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि त्याला कॅमेरा देखील आहे. यामुळे आता असे करण्यापूर्वी लोक विचार करतात.