सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना जहीर इक्बाल याने थेट बुडवले पाण्यात, व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का..

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे म्हणणे आहे की, जहीर इक्बाल याने सोनाक्षी सिन्हा हिचा विश्वासघात केला. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट केल्या जात आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना जहीर इक्बाल याने थेट बुडवले पाण्यात, व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का..
Sonakshi Sinha Zaheer Iqbal
| Updated on: Jun 10, 2026 | 11:02 AM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सुरूवातीला जहीर इक्बाल याच्यासोबत सोनाक्षी लग्न करत असल्याचे कळताच अनेकांना धक्का बसला. सोनाक्षी सिन्हा हिच्या दोन्ही भावांचा या लग्नाला विरोध असल्याचे बोलले जाते. आई पूनम सिन्हा आणि वडील शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नात उपस्थित होते. तिच्या दोन्ही भावांनी या लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बाल याच्यासोबत कायमच विदेशात जाताना दिसते. दोघेजण मस्त धमाल आणि मस्ती करतात. सोनाक्षी ही जहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर आलिशान घरात शिफ्ट झाली. सोनाक्षीने यापूर्वी तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांची पहिली भेट सलमान खान याच्या घरी झाली. पहिल्याच भेटीत दोघेजण कित्येक तास गप्पा मारत बसले होते.

सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत जंगी पद्धतीने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मुंबईत खास पार्टीचे आयोजन करण्यात आले. बॉलिवूडचे कलाकार या पार्टीत पोहोचले होते. आता नुकताच जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने लोकांना धक्का बसला. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी आणि जहीर इक्बाल एका स्विमिंग पुलमध्ये दिसत आहेत.

सोनाक्षी स्विमिंग पुलमध्ये बसली आहे. तिचे लक्ष नाही. यादरम्यानच जहीर इक्बाल हा सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना थेट दिला पाण्यात ओढतो आणि बुडवतो. नक्की काय झाले हे सोनाक्षीला देखील कळत नाही. त्यानंतर दूर जाऊन जहीर इक्बाल हा हसताना दिसत आहे. आता हाच जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. जहीर इक्बाल हा सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत अशाप्रकारची मस्ती कायमच करतो. मात्र, अनेकांचे म्हणणे आहे की, सोनाक्षी सिन्हा हिला मोठा धोका जहीरने दिला आणि तिला पाण्यात बुडवले. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतात.

Follow Us