स्वरा भास्कर हिने यामुळे पती फहाद अहमद याला म्हटले होते ‘भाऊ’ मोठा खुलासा करत..

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. स्वरा भास्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, स्वरा भास्कर हिने तिच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली.

स्वरा भास्कर हिने यामुळे पती फहाद अहमद याला म्हटले होते भाऊ मोठा खुलासा करत..
| Updated on: Mar 06, 2024 | 5:20 PM

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. स्वरा भास्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. स्वरा भास्कर हिने बाॅलिवूडच्या हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. स्वरा भास्कर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिने एका गोंडस मुलीला जन्म देखील दिलाय. स्वरा भास्कर हिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

हेच नाही तर 2023 मध्ये एक पोस्ट शेअर करत फहाद अहमद याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्वरा भास्कर ही दिसली होती. त्या पोस्टमध्ये चक्क फहाद अहमद याला भाई म्हणताना स्वरा भास्कर दिसली होती. त्यानंतर थेट 16 फेब्रुवारी 2023 ला त्याच फहाद अहमद याच्यासोबत स्वरा भास्कर हिने लग्न केले. यानंतर लोक हैराण झाले.

यानंतर स्वरा भास्कर हिच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, दिल्लीवाले लोक मित्रांना भाई वगैरे म्हणून बोलतात आणि त्याचमध्ये मी देखील फहाद अहमद याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाई म्हटले. हेच नाही तर स्वरा भास्कर हिने अगोदर फहाद अहमद याच्यासोबत कोर्टात लग्न केले. कोर्टातील लग्नाचे फोटो स्वराने सोशल मीडियावर शेअर केले.

स्वरा भास्कर हिने पोस्टमध्ये अगोदर फहाद अहमद याला भाई म्हटल्याने तिची खिल्ली उडवताना देखील अनेक लोक दिसले. लग्नाच्या काही दिवसांमध्येच स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत आपण प्रेग्नंट असल्याचे जाहिर केले. मध्यंतरी अशीही चर्चा होती की, स्वरा भास्कर ही लग्नाच्या अगोदरच प्रेग्नंट होती.

फहाद अहमद याच्यासोबत खास फोटो शेअर करताना नेहमीच स्वरा दिसते. फहाद अहमद आणि स्वरा भास्कर यांनी ओळख ही आंदोलनमध्ये झाली. सुरूवातीला फहाद अहमद आणि स्वरा भास्कर हे चांगले मित्र होते आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर ही तिच्या मुलीसोबत विमानतळावर स्पाॅट झाली. याचे काही फोटोही व्हायरल झाले.