Madhuri Dixit Son Arin Girlfriend: कोण आहे माधुरी दीक्षितच्या मुलाची गर्लफ्रेंड खुशी? श्रीराम ननेंच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण

Madhuri Dixit Son Arin Girlfriend: अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. पण आता माधुरी हिच्याबद्दल नाही तर, तिच्या मुलाच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. तर डॉ. श्रीराम नेने यांनी शेअर केलेल्या पोस्टनंतर चर्चांना उधाण आलं आहे.

Madhuri Dixit Son Arin Girlfriend: कोण आहे माधुरी दीक्षितच्या मुलाची गर्लफ्रेंड खुशी? श्रीराम ननेंच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण
Madhuri Dixit
| Updated on: Nov 08, 2026 | 9:47 AM

Madhuri Dixit Son Arin Girlfriend: बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिच्या कुटुंबाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकताच पार पडलेल्या मनीष मल्होत्रा याच्या ग्रँड पार्टीमध्ये माधुरी तिच्या कुटुंबियांसोबत उपस्थित होती. या पार्टीमध्ये माधुरी दीक्षित, श्रीराम नेने यांच्यासोबत मोठा मुलगा अरिन देखील उपस्थित होता. पण सर्वांच्या नजरा अरिन याची गर्लफ्रेंड खुशी हिच्यावर येऊन थांबल्या. पापाराझींना पोज देताना माधुरी आणि नेने यांच्यासोबत अरिनसोबत त्याची गर्लफ्रेंड देखील होती. यावेळी अरिन गर्लफ्रेंडकडे एकटक पाहताना दिसला… सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

रेड कार्पेट आणि इनसाइड पार्टीमध्ये दोघेही एकमेकांसोबत आनंदाने पोझ देत होते. एवढंच नाही तर, अरिन आणि खुशीने माधुरी दीक्षित आणि डॉ. नेने यांच्यासोबत फॅमिली फोटोही काढले. ज्यावरून हे स्पष्ट होत आहे की, दोघांच्या नात्याला कुटुंबाची पसंती मिळाली आहे. आता डॉक्टर श्रीराम नेने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिवाळी पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो देखील तुफान व्हायरल होत आहेत.

Loading...

 

माधुरी, अरिन आणि खुशी यांच्यासोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये श्रीराम नेने म्हणतात, “आनंदी चेहरे, हास्य आणि सुंदर आठवणींनी भरलेली ही एक संध्याकाळ. आम्हाला सर्वांना अशा खास अंदाजात एकत्र आणल्याबद्दल धन्यवाद, @manishmalhotra05 !” असं म्हणत नेने यांनी मनीष मल्होत्रा याचे आभार मानले.

कोण आहे अरिन याची गर्ल फ्रेंड खुशी?

सोशल मीडियावर आता खुशीबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. सांगायचं झालं तर, खुशीच्या बॅकग्राउंड आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अद्याप तरी फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु मनीष मल्होत्रा याच्या एवढ्या मोठ्या स्टार-स्टडेड पार्टीत नेने कुटुंबासोबत तिच्या उपस्थितीची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट्सनंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

खुशी आणि अरिन हे दोघेही अमेरिकेत एकत्र शिक्षण घेतात. दोघांनीही एकत्र घालवलेल्या क्षणांचे अनेक फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, अरिन हा माधुरी आणि श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा आहे. याआधी त्याने करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातअसिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.

माधुरीचा मोठा मुलगा आहे अरिन

माधुरी आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहे. अरिन नेने आणि रयान नेने. अरिन हा त्यांचा मोठा मुलगा आहे, तर रयान हा छोटा मुलगा आहे. अरिन हा बहुतांश वेळा प्रसिद्धीच्या झोतापासून दूरच राहिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us