
गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. काही रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद टोकाला गेलाय. आता ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा म्हटले की, सलमान खान याचे नाव तर पुढे येणारच ना. सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. हेच नाही तर हे दोघे लग्न करणार असल्याचेही सांगितले जात होते. मात्र, यांचे लग्न होऊ शकले नाही. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी धमाका करताना दिसली. प्रेक्षकांनी या जोडीला प्रचंड असे प्रेमही दिले.
विशेष म्हणजे या चित्रपटाच्यानंतरच यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. हेच नाही तर 2000 मध्ये एका चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे चक्क बहीण भावाच्या भूमिकेत देखील दिसणार होते. या चित्रपटाचे नाव जोश होते. मात्र, या चित्रपटामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या नव्हे तर ऐश्वर्या राय आणि शाहरुख खान यांनी बहीण भावाची भूमिका साकारली.
शाहरुखच्या आधी आमिर आणि सलमान या चित्रपटात कास्ट होणार होते. जोश चित्रपटामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या भावा बहिणीचे पात्र साकारणार होते. मात्र, शेवटी शाहरुख याच्यामुळे हे होऊ शकले नाही. ऐश्वर्या राय एका मुलाखतीमध्ये याबद्दलचा खुलासा करताना दिसली. ऐश्वर्याने म्हटले की, जोशमध्ये सलमान खान आणि आमिर खान सोबत कास्ट करणार आहे.
2018 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, जोश या चित्रपटात सलमान आणि आमिरला सुरुवातीला मुख्य भूमिकेसाठी कास्ट केले जाणार होते. मात्र, ते पुढे होऊ शकले नाही. अशी देखील त्यावेळी चर्चा रंगताना दिसली की, सलमान खान याला ऐश्वर्या राय हिच्यासोबत भावाचा रोल करायचा नव्हता. सलमान खानऐवजी शाहरुख भावाच्या भूमिकेत दिसला. ऐश्वर्या राय हिने सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला डेट करण्यास सुरूवात केली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे चित्रपटाच्या शूटिंगवेळीच एकमेकांच्या प्रेमात पडले. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न केले. मात्र, दुसरीकडे सलमान खान याने ऐश्वर्या हिच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर लग्न केले नाही.