आमिर खानच्या लाडक्या लेकीचा मुंबईत झाला साखरपुडा, वाचा कोण आहे अभिनेत्याचा जावई

इतकेच नाही तर इरा आणि नुपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू होत्या.

आमिर खानच्या लाडक्या लेकीचा मुंबईत झाला साखरपुडा, वाचा कोण आहे अभिनेत्याचा जावई
| Updated on: Nov 18, 2022 | 8:23 PM

मुंबई : आमिर खानची लेक इरा खान गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. इरा आपला प्रियकर नुपूर शिखरेसोबत कायमच फोटो सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वीच इराने नुपूरच्या मांडीवर झोपलेले दोन फोटो शेअर केले होते. इतकेच नाही तर इरा आणि नुपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू होत्या. इराचे चाहते तिच्या लग्नाची वाट पाहात आहेत. नुपूर आणि इरा दोघेही ऐकमेकांचे बर्थडे स्पेशल करून  त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आता इरा आणि नुपूर यांच्याविषयी एक अत्यंत मोठी बातमी पुढे येतंय.

आमिर खानचे लेक इरा गेल्या दोन वर्षांपासून नुपूर शिखरेला डेट करत होती. इतकेच नाही तर प्यार किया तो डरना क्या…म्हटल्याप्रमाणे इरा नेहमीच नुपूरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायची. नुपूर आणि इरा कायमचसोबत स्पाॅट देखील व्हायचे.

इरा आणि नुपूर यांच्या नात्याविषयी आता एक महत्वाची बातमी पुढे येत आहे. मुंबईत आज इरा आणि नुपूरचा साखरपुडा झाल्याचे कळते आहे. अगदी मोजक्या लोकांमध्ये हा साखरपुडा पार पडला असल्याचे सांगितले जात आहे.

इरा आणि नुपूरच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. या फोटोंमध्ये इरा आणि नुपूर आनंदात दिसत असून यांच्यासोबत आमिर खानही दिसत आहे. आता हे दोघे लग्न कधी करणार हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय.

या खास कार्यक्रमात इराचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. वडील आमिर खान, आई रीना दत्ता, आजी, काकू, किरण राव आणि इतरही अनेक नातेवाईक या कार्यक्रमासाठी खास उपस्थित होते.

या कार्यक्रमामधील आमिर खानचा लूक त्याच्या चाहत्यांना फार आवडलेला दिसत नाहीये. कारण याही फोटोमध्ये आमिर खानची पांढरी दाढी दिसत आहे. पांढऱ्या रंगाचा ड्रेस आमिर खानने घातला होता.

नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर असून आतापर्यंत त्याने अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर काही दिवस आमिर खानचा देखील नुपूर फिटनेस ट्रेनर होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us