
आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे बॉलीवूड अभिनेते जितेंद्र हे आता मालामाल बनले आहेत. जिंतेंद्र यांनी त्यांची अंधेरी येथे असलेली मालमत्ता विकली आहे. IGR च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांची स्क्वेअर यार्ड्सने तपासणी असता जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्या पॅन्थियन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी मुंबईतील अंधेरी मालमत्ता ८५५ कोटी रूपयांना विकल्याचे समोर आले आहे. तसेच हा व्यवहार मे २०२५ मध्ये झाला असल्याचीही मिळाली आहे.
२.३९ एकरमध्ये पसरली होती मालमत्ता
स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, या व्यवहारात एकूण ९,६६४.६८ चौरस मीटर (२.३९ एकर) क्षेत्रफळातील मालमत्तेचा समावेश होता. या जागेवर सध्या बालाजी आयटी पार्क आहे आणि यात तीन इमारती बांधलेल्या आहेत. या सर्व मालमत्तेचे एकूण बांधकाम क्षेत्र ४५,५७२.१४ चौरस मीटर (४,९०,५३४ चौरस फूट) आहे. तसेच या व्यवहारात ८.६९ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० नोंदणी शुल्काचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.
या कंपनीने मालमत्ता खरेदी केली
समोर आलेल्या माहितीनुसार जितेंद्र आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीची असलेली ही मालमत्ता एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केली आहे. या कंपनीचे पूर्वीचे नाव नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड असे होते. हा कंपनी सार्वजनिक आणि खाजगी क्लाउड सोल्यूशन्स, होस्टिंग, डेटा व्यवस्थापन, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, सायबर थ्रेट मॉनिटरिंग, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क आणि टेस्टिंग सेवांसह इतरही अनेक सेवा देते.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, लिंक रोडची कनेक्टिव्हिटी
बॉलिवूड अभिनेते जितेंद्र कपूर यांनी विकलेली मालमत्ता ही मुंबईतील प्रमुख परिसर असलेला अंधेरीत होती.अंधेरीला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, लिंक रोड, एसव्ही रोड आणि वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाईनद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे जितेंद्र यांनी चांगली डील मिळाली आहे.
अंधेरी हे नवे व्यावसायिक केंद्र
मुंबईतील अंधेरी हा परिसर नवीन व्यावसायिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. या भागात आधुनिक ऑफिस कॉम्प्लेक्स, को-वर्किंग स्पेस, अपस्केल रिटेल दुकाने आहेत. त्यामुळे या भागातील मालमत्तेच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. जितेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातून मिळालेल्या कमाईतून खरेदी केलेली मालमत्ता आता त्यांनी विकलेली आहे.