Birth Anniversary | सर्वात जास्त मानधन घेणारी म्हणून गाजले अभिनेत्री ‘साधना’ यांचे नाव, ‘या’ कारणामुळे लोकप्रिय झाली हेअरस्टाईल!

| Updated on: Sep 02, 2021 | 7:25 AM

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साधना (Sadhana Shivdasani) 60च्या दशकात सर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. साधनाचे पूर्ण नाव साधना शिवदासानी होते. 1960 मध्ये रिलीज झालेल्या 'लव्ह इन शिमला' या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता.

Birth Anniversary | सर्वात जास्त मानधन घेणारी म्हणून गाजले अभिनेत्री ‘साधना’ यांचे नाव, ‘या’ कारणामुळे लोकप्रिय झाली हेअरस्टाईल!
साधना शिवदासानी
Follow us on

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साधना (Sadhana Shivdasani) 60च्या दशकात सर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. साधनाचे पूर्ण नाव साधना शिवदासानी होते. 1960 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. या चित्रपटाला केवळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर यासह चित्रपटातील साधना यांची हेअरस्टाईल इतकी लोकप्रिय झाली की, ती त्यांची स्टाईल स्टेटमेंट बनली. साधना यांनी आपला बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरू केला.

यानंतर, वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्या एका कॅमिओमध्ये दिसल्या. यानंतर त्यांना एकापेक्षा एक भूमिका मिळू लागल्या. फार कमी लोकांना माहित आहे की, पहिल्याच चित्रपटानंतर राज कपूर आणि साधना यांच्यात इतका दुरावा निर्माण झाला होता की, ती त्यांचा खूप तिरस्कार करू लागली होती.

म्हणून ठेवले ‘साधना’ नाव

साधना यांचा जन्म कराची, पाकिस्तान येथील एका सिंधी कुटुंबात झाला होता. त्या त्यांच्या आई-वडिलांच्या एकुलत्या एक अपत्य होत्या. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब कराची सोडून मुंबईत स्थायिक झाले. साधनाच्या वडिलांना अभिनेत्री साधना बोस आवडायची, म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे नावही साधना ठेवले.

बालकलाकार म्हणून सुरुवात

साधना वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून मनोरंजन विश्वात काम करू लागल्या होत्या. साधना राज कपूरच्या ‘श्री 420’ चित्रपटातील गाणे ‘मूड-मूड के ना देख’ याच्या कोरसमध्ये होत्या. यानंतर त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी ‘अबाना’ या सिंधी चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केले. या चित्रपटासाठी त्यांना फक्त 1 रुपयांची टोकन रक्कम मिळाली होती. ‘अबाना’ या चित्रपटानंतर साधना यांचे फोटो एका मासिकात छापून आले. तत्कालीन प्रसिद्ध निर्माते शशधर मुखर्जी यांनी ते फोटो पाहिले आणि साधना यांना त्यांच्या ‘लव्ह इन शिमला’ चित्रपटात पहिली संधी दिली. यानंतर साधना ‘मेरा साया’, ‘वो कौन थी’ आणि ‘वक्त’ यासारख्या हिंदी चित्रपटांच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसल्या. त्यांनी सुमारे 35 फीचर चित्रपटांमध्ये काम केले.

केशरचनेचे श्रेय

चित्रपटाचे दिग्दर्शक आर के नय्यर यांना साधनाचा चेहरा थोडा विचित्र वाटला. नय्यर यांना साधनेचे कपाळ खूप मोठे वाटत होते. म्हणून त्यांनी साधनाची केशरचना हॉलिवूड अभिनेत्री ऑडी हेपबर्नसारखी करून घेतली आणि कपाळ लपवण्यासाठी, कपाळावर केस पुढे पसरवले. पुढे हीच केशरचना साधना यांची ओळख बनली.

वैयक्तिक आयुष्य

साधना यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, दिग्दर्शक आर के नय्यर यांच्या प्रेमात पडल्यानंतर, मार्च 1966 मध्ये त्यांचे लग्न झाले. साधना त्यांच्या पतीला प्रेमाने रुमी म्हणत असत. साधना यांनी आरके नय्यर यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये काम केले. नय्यर हे साधनापेक्षा बरेच मोठे होते. म्हणूनच साधनाचे पालक या लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हते. साधना यांना अपत्य नव्हते. दम्यामुळे 1995मध्ये आर के नय्यर यांचे निधन झाले.

1995 मध्ये पतीच्या निधनानंतर साधना एकट्या पडल्या. अखेरच्या दिवसात त्या मुंबईतील एका जुन्या बंगल्यात भाड्याने राहत होत्या. हा बंगला आशा भोसले यांचा होता. साधनाला थायरॉईड आजार असल्याचे निदान झाले होते. यामुळे त्याच्या डोळ्यांवरही परिणाम होऊ लागला. तिच्या शेवटच्या दिवसातही साधना विस्मृतीचे आयुष्य जगल्या.

हेही वाचा :

Shruti Marathe : श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल