क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी अक्षय कुमार गोव्यात, अभिनेत्याच्या व्हिडीओवर पत्नीने केली ही कमेंट…

अक्षय सोशल मीडियावरही फार सक्रिय असतो. अक्षय प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या चाहत्यांना अपडेट देत राहतो.

क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी अक्षय कुमार गोव्यात, अभिनेत्याच्या व्हिडीओवर पत्नीने केली ही कमेंट...
| Updated on: Dec 25, 2022 | 10:01 PM

मुंबई : क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी बाॅलिवूडचे स्टार विदेशात जाताना दिसत आहेत. मात्र, सर्वांचा आवडता अभिनेता जो एका वर्षामध्ये तब्बल चार ते पाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो, तो अक्षय कुमार हा क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी गोव्यामध्ये पोहचला आहे. अक्षय सोशल मीडियावरही फार सक्रिय असतो. अक्षय प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्या चाहत्यांना अपडेट देत राहतो. नुकताच अक्षय कुमार याने आपल्या सोशल मीडियावर एक गोव्यामधील त्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे क्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी त्यांच्या आलिबागमधील नव्या बंगल्यामध्ये गेले आहेत. यांचे आलिबागला जातानाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इकडे अक्षय कुमार हा देखील आपल्या फॅमिलीसोबत गोव्यामध्ये दाखल झाला आहे. अक्षय कुमारने गोव्यामधील जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अक्षय हा एकदम मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार हा हातामध्ये गिटार घेऊन क्रिसमसचे गाणे म्हणताना दिसतोय. अक्षय कुमारने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अक्षयचे चाहते हे त्याला नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

अक्षय कुमारच्या पत्नीने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ट्विंकल खन्नाने म्हटले आहे की, चांगली गोष्ट आहे…जेंव्हा हे होत होते तेंव्हा मी तिथेच होते. आता अक्षय कुमारचा हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.