Latest Marathi News : ट्विटरला ‘मौसी’ म्हणाले अन् एलन मस्कला… तू चीज बडी है musk musk… अमिताभ बच्चन यांचं ट्विट तुफान व्हायरल

| Updated on: Apr 22, 2023 | 6:46 AM

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचे तीन ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहेत. ब्ल्यू टिक मिळाल्यानंतर रात्री एक वाजता अमिताभ यांनी मिश्किल शैलीत हे ट्विट केले आहेत.

Latest Marathi News : ट्विटरला मौसी म्हणाले अन् एलन मस्कला... तू चीज बडी है  musk musk... अमिताभ बच्चन यांचं ट्विट तुफान व्हायरल
amitabh bachchan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या तीन ट्विटमुळे प्रचंड चर्चेत आहेत. कालपासून ट्विटरने सर्वांचीच ब्ल्यू टिक हटवली आहे. ज्यांना ब्ल्यू टिक हवी आहे त्यांना आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ट्विटरचा हा फटका सर्वांनाच बसला. बिग बी अमिताभ बच्चनपासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत. तर सचिन तेंडुलकर यांच्यापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वचजण आपली ब्ल्यू टिक हरवून बसले. अमिताभ यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे भरले. पण ब्ल्यू टिक आली नाही. त्यामुळे त्यांनी ट्विटरला हात जोडणारं ट्विट केलं. हे ट्विट व्हायरल होत नाही. तोच अमिताभ यांना ब्ल्यू टिक मिळाली. त्यानंतर अमिताभ यांनी तीन ट्विट केले. एका ट्विटमध्ये त्यांनी ट्विटरला चक्क मौसी म्हटलंय. तर दुसऱ्या ट्विटमध्ये ट्विटरचा सर्वेसर्वा एलन मस्कला… तू चीज बडी है musk musk… म्हटलंय. अमिताभ यांचे हे तिन्ही ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा

तू चीज बडी है मस्क मस्क…

अमिताभ बच्चन यांनी रात्री एक वाजता तीन ट्विट केले आहेत. त्यात ते म्हणतात, ए मस्क भैया… मी तुला खूप खूप धन्यवाद देत आहे. तू माझ्या नावाच्या पुढे ब्ल्यू टिक लावली आहेस. आता तुला काय सांगू? एक गाणं गुणगुणावसं वाटतंय. ऐकतोयस ना? मग ऐक… तू चीज बडी है मस्क मस्क…तू चीज बडी है मस्क मस्क… असं गंमतीशीर ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.

 

ट्विटर म्हणजे मौसी

त्यानंतर अमिताभ यांनी दुसरं ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी ट्विटरला चक्क मौसी (मावशी) म्हटलं आहे. अरे ट्विटर मौसी… गजबच झालं. ब्ल्यू टिक लावल्यानंतर आता ब्ल्यू टिक एकटा असून तो घाबरत आहे. त्यामुळे त्याला साथ द्यावी असं मला वाटलं. त्यामुळे त्याच्या बाजूला मी झेंडा लावला. झेंडा लावून काही क्षणही झाला नाही तोच ब्ल्यू टिक गायब झाला. आता? काय करू?; अशी मिश्किल विचारणा अमिताभ यांनी केली आहे.

 

ट्विटरला मौसी का म्हटलं?

तिसऱ्या ट्विटमध्ये अमिताभ यांनी ट्विटरला मौसी का म्हटलंय हे सांगितलंय. हे बओघा… आणखी अडचण आलीय. ट्विटरला तू भाऊ म्हणतोस आणि आता मावशी कशी झालीय? तर मी त्यांना समजावलं की, ट्विटरवर आधी श्वान आलं तेव्हा त्याला भाऊ म्हटलं. पुन्हा त्यांनी ट्विटरवर चिमणी आणली. आता चिमणी तर मावशीच असते ना… असं म्हणत अमिताभ यांनी ट्विटरला मावशी का म्हटलंय हे स्पष्ट केलं आहे.