
मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने बाॅलिवूडमध्ये शोककळा पसरलीये. चाहत्यांना देखील सतीश कौशिक यांच्या निधनाने मोठा धक्का बसलायं. दोन दिवसांपूर्वी मुंबईमधील (Mumbai) आयोजित होळी पार्टीमध्ये सतीश कौशिक पोहचले होते. इतकेच नाहीतर दिल्ली येथेही कुटुंबियांसोबत होळी सेलिब्रेट करण्यासाठी सतीश कौशिक गेले होते. आता या होळी पार्टीमधील काही खास फोटो आणि व्हिडीओ (Video) पुढे येत आहेत. सतीश कौशिक यांचे पार्थिव आता मुंबईमध्ये पोहचले आहे आणि आता त्यांच्या घरी आणले जाणार आहे.
वयाच्या 66 व्या सतीश कौशिक यांनी शेवटच्या श्वास घेतला. सतीश कौशिक यांचे पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सने कलिना विमानतळावर अगोदर पोहोचले. आता मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव पोहचले. सतीश कौशिक यांचे अंतिम दर्शन करण्यासाठी बाॅलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित आहेत.
आज मुंबईमध्ये सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार केले जाणार आहेत. सतीश कौशिक यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. सतीश कौशिक यांच्या मुंबईतील घराबाहेर कलाकारांनी मोठी गर्दी केलीये. चाहतेही आपल्या आवडत्या स्टारला शेवटचा निरोप देण्यासाठी जमले आहेत.
सलमान खान याने सतीश कौशिक यांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. बाॅलिवूडच्या अनेक मोठ्या स्टारने सतीश कौशिक यांच्या आठवणीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सांगितली.
सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांच्यामध्ये खास मैत्री होती. रूप की रानी चोरों का राजा या सतीश कौशिक यांच्या चित्रपटात अनुपम खेर हे महत्वाच्या भूमिकेत होते. हा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. सतीश कौशिक यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसवण्याचे काम कायमच केले.
सतीश कौशिक यांनी त्याच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. अभिनयासोबतच त्यांनी एक दिग्दर्शक म्हणून नव्या प्रवासाला सुरूवात केली. सलमान खान याचे चित्रपट ज्यावेळी बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. त्यावेळी सतीश कौशिक यांचा तेरे नाम हा चित्रपट सलमान खान याच्यासाठी लक्की ठरला.