
मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनाचा ग्रँड प्रीमीयर सोहळा रविवारी पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन मराठी अभिनेता रितेश देशमुख करत आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक कलाकार, सोशल मीडियावरील रीलस्टारही दिसणार आहेत. त्यामुळे या सीझनमध्ये चाहत्यांचं फुल टू मनोरंजन होणार आहे. बिग बॉसमध्ये एका अशा अभिनेत्रीने एन्ट्री मारलीये जिचे चार महिन्यांआधी लग्न झालं आहे. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या.
जीव माझा गुंतला मालिकेतील ‘अंतरा’ म्हणजेच योगिता चव्हाणने बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री केलीये काही दिवसांआधीच योगिता आणि सहकलाकार सौरभ चौघुले यांनी विवाह केला होता. दोघेही ३ मार्चला विवाहबंधनात अडकले होते. नवीन लग्न झालेलं असताना योगिताने बिग बॉसमध्ये आल्यावर रितेश देशमुखने तिची फिरकी घेतली. दोघांमध्ये नक्की कोणाला कंटाळा आलाय असं रितेश सुरूवातीला म्हणाला.
तीन महिन्यासाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहे. नक्की कोणाला कंटाळा आलाय असं रितेश देशमुख बोलताच हास्याचे कारंजे उडाले. तुम्ही बिग बॉसच्या घरात असणार, तुम्ही काय करत आहात ते सर्व दिसणार पण तुमचे पतीदेव बाहेर काय-काय करतायेत हे तुम्हाला कसं कळणार? असा सवाल रितेशने योगितला केला. यावर बोलताना मला वाटत नाही बिग बॉसच्या घरात असताना बाहेरचा विचार करायला वेळ मिळेल. पण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास असल्याचं योगिता म्हणाली.
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण, हिला इंडियन आयडल, मराठी मुलगा अभिजीत सावंत, ‘भाग्य दिले तू मला’ सिरियल फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, विनोदवीर पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे, ‘रमा राघव’ मालिकेचा फेम अभिनेता निखिल दामले, कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू, मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री वर्षा उसगांवकर, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील, बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉस मराठी सीझन 5 चे स्पर्धक आहेत.