Birth Anniversary : अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’मध्ये काम करण्यास उत्सुक होते राजेंद्र कुमार, अपूर्णच राहिली इच्छा!

| Updated on: Jul 20, 2021 | 4:35 PM

राजेंद्र कुमार हे एकमेव कलाकार होते ज्यांचे अनेक सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. राजेंद्र कुमार यांना याच कारणास्तव ‘ज्युबिली कुमार’ या नावाने ओळखले जाऊ लागले होते.

Birth Anniversary : अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’मध्ये काम करण्यास उत्सुक होते राजेंद्र कुमार, अपूर्णच राहिली इच्छा!
राजेंद्र कुमार
Follow us on

मुंबई : आज (20 जुलै) ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) यांची जयंती आहे. राजेंद्र कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता होते. राजेंद्र कुमार हे एकमेव कलाकार होते ज्यांचे अनेक सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. राजेंद्र कुमार यांना याच कारणास्तव ‘ज्युबिली कुमार’ या नावाने ओळखले जाऊ लागले होते. 1950मध्ये त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. दिलीप कुमार आणि नर्गिस स्टारर फिल्म ‘जोगन’ या चित्रपटात ते एका छोट्या भूमिकेत दिसले होते.

यानंतर ते 80हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले. तथापि, 1955मध्ये रिलीज झालेल्या ‘वचन’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. हा चित्रपट राजेंद्र कुमार यांचा हा पहिला सिल्व्हर ज्युबली चित्रपट होता. राजेंद्र कुमार यांनी 60च्या दशकात ‘दिल एक मंदिर’ , ‘आरझू’ , ‘मेरे मेहबूब’ आणि ‘संगम’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले, पण 70च्या दशकापर्यंत इंडस्ट्रीमधील त्यांचे आकर्षण संपुष्टात येऊ लागले. कारण याच काळात राजेश खन्ना यांचे नशिब चमकले.

‘डॉन’मध्ये काम करू इच्छित होते राजेंद्रकुमार

आपली कारकीर्द उताराकडे जाताना पाहून राजेंद्र कुमार आपल्या वयाला साजेसे पण इंडस्ट्रीत टिकून राहण्याइतके प्रभावी असे पात्र शोधत होते. दरम्यान, दिग्दर्शक चंद्रा बरोट ‘डॉन’ चित्रपट बनवत असल्याचे राजेंद्र कुमार यांना समजले. या चित्रपटाची कथा सलीम खान यांनी लिहिली आहे.

चित्रपट निर्माते डॉनसाठी फायनान्सर शोधत असल्याचे राजेंद्र कुमार यांना समजले. अशा परिस्थितीत डॉन चित्रपटाच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव राजेंद्र कुमार यांनी चंद्रा बरोट आणि सलीम खान यांच्यासमोर ठेवला. या संदर्भात, एक दिवस सलीम आणि चंद्र यांनी राजेंद्र कुमार यांची भेट घेतली. अन्नू कपूर यांनी आपल्या एका कार्यक्रमात सांगितले होते की, सलीम खान आणि चंद्रा बरोट यांनी या चित्रपटाच्या कथेवर चर्चा सुरू केली, तेव्हा राजेंद्र कुमार यांनी चर्चेत पोलिस अधिकाऱ्याची भूमिका देण्याची अट घातली.

राजेंद्रचा सल्ला सलीम आणि चंद्राला आवडला नाही!

‘डॉन’ चित्रपटात अभिनेता इफ्तेखार यांनी साकारलेली हीच ती भूमिका. सलीम आणि चंद्रा यांना ती भूमिका देण्यास हरकत नव्हती, परंतु जेव्हा राजेंद्र कुमार आपली भूमिका वाढवू लागले आणि त्याबद्दल अधिक सल्ला देऊ लागले तेव्हा सलीम आणि चंद्र यांचे मन खट्टू झाले. बरेच दिवस राजेंद्र चित्रपटाबद्दल सल्ला देत राहिले. मग, जेव्हा बैठक संपली आणि ते दोघेही राजेंद्र कार्यालयातून बाहेर आले, तेव्हा सलीम खान यांनी चंद्र बरोट यांना सांगितले की, हे प्रकरण असे थांबणार नाही.

सलीम खानचे शब्द खरे ठरले. यानंतर राजेंद्र कुमार यांच्या हातून पोलिस अधिकाऱ्याची भूमिका तर गेलीच, पण त्याचबरोबर चित्रपटासाठी अर्थपुरवठा करण्याची संधी देखील त्यांना मिळाली नाही. अशा प्रकारे, ‘डॉन’ चित्रपटात येण्याची राजेंद्र कुमार यांची इच्छा पूर्ण होऊच शकली नाही.

(Birth Anniversary Rajendra Kumar was eager to work in Amitabh Bachchan’s DON the wish remained unfulfilled)

हेही वाचा :

Vaidehi Dongre | 60 स्पर्धकांना मागे टाकत मिशिगनच्या वैदेही डोंगरेने जिंकले मिस इंडिया यूएसए विजेतेपद!  

Anup Soni | ‘क्राईम पेट्रोल’ फेम अनुप सोनी आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलिसांची मदत करणार