Thalaivii BO Collection Day 1: कंगनाची जादू नाहीच, ‘थलायवी’कडे प्रेक्षकांची पाठ; पहिल्या दिवशी इतकीच कमाई

| Updated on: Sep 11, 2021 | 6:00 PM

हिंदी भाषिक भागात या चित्रपटाचा परफॉर्मन्स खूपच वाईट आहे. कंगना रानौत आणि अरविंद स्वामी सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सजलेला हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. (Bollywood Actress Kangana Ranaut's Thalaivii Movie's Box office Collection Day 1)

Thalaivii BO Collection Day 1: कंगनाची जादू नाहीच, थलायवीकडे प्रेक्षकांची पाठ; पहिल्या दिवशी इतकीच कमाई
Follow us on

मुंबई : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘थलायवी’ (Thalaivii) हा चित्रपट, हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनाचं या चित्रपटासाठी फार कौतुक होत होतं, मात्र कंगना प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यात अपयशी ठरली. हिंदी भाषिक भागात या चित्रपटाचा परफॉर्मन्स खूपच वाईट आहे. कंगना रानौत आणि अरविंद स्वामी सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांनी सजलेला हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. जिथं एकीकडे चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी दक्षिण भारतीय भाषेत एक कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर दुसरीकडे, उत्तर भारतातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट उत्तर भारत आणि हिंदी भाषेत एकूण 25 लाख रुपयांची कमाई करू शकला. तमिळ, तेलुगू आणि हिंदी .. या तीन भाषांचा समावेश करून कंगना रनौतच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकूण 1.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाला कमी प्रेक्षक मिळाले, यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनही खूप खराब झालं.

या आठवड्याच्या शेवटी चांगला पैसा कमवू शकतात

दिल्ली, पंजाब, गुजरात आणि दक्षिण भारत वगळता भारताच्या इतर अनेक भागांमध्ये चित्रपटाची कामगिरी निराशाजनक होती. या चित्रपटानं दक्षिण भारतात जास्त कमाई केली असती, मात्र या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद चांगला मिळाला नाही. उत्तम सामग्री आणि अप्रतिम अभिनय असूनही, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चित्रपटानं बाजी मारू शकला नाही. मात्र, अद्याप काहीही सांगता येणार नाही. असं मानलं जातंय की चित्रपट विकेंडला चांगला कलेक्शन करू शकतो.

बॉक्स ऑफिसवर ‘थलायवी’ च्या कमी कलेक्शनचे कारण काय?

केवळ कंगनाचे चाहतेच नाही तर जयललिताचे लाखो चाहते कंगनाच्या या चित्रपटाची वाट पाहत होते. अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांपासून, असे अहवाल समोर आले आहेत की हा चित्रपट देखील एकाच वेळी दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल. तर, सिनेमागृहाबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचे हिंदी अधिकार प्रसारित करण्यासाठी फक्त दोन आठवडे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर तेलगू आणि तामिळ भाषेतील चित्रपटाला चार आठवडे मिळाले आहेत.

अशा परिस्थितीत, आता जेव्हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं की हा चित्रपट एकाच वेळी दोन OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल, तेव्हा लोक OTT वर रिलीजची वाट पाहत असतील आणि म्हणूनच त्यांनी हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला असेल. जर चित्रपट OTT वर रिलीज होत असेल तर प्रेक्षकांना घरी बसून हा अद्भुत चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येईल. मात्र आता काहीही सांगणं म्हणजे फार घाई केल्या सारखं आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त एक दिवस झाला आहे. आज चित्रपटाचा दुसरा दिवस आहे. बघूया चित्रपट आठवड्याच्या शेवटी चमत्कार करू शकतो की नाही…

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : जयललिता असत्या तर कंगनाऐवजी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली असती बायोपिकमध्ये काम करण्याची पहिली संधी

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

Mouni Roy : मौनी रॉयचा कातिलाना अंदाज, ब्लू शिमरी ड्रेसमध्ये केलं नवं फोटोशूट